Monsoon Fitness Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Fitness Tips: पावसाळ्यात फिट राहायचे असेल तर 'अशी' घ्या काळजी

पावसाळा सुरू झाला असून फिटनेसची काळजी घेणे काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Monsoon Fitness Tips: पावसाळा सुरू झाला असून उन्हापासून दिलासा मिळाला आहे. पण दुसरीकडे डेंग्यू, मलेरियासारखे आजारही घेऊन येतो हे लक्षात घेयला हवं. या ऋतूमध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा न बाळगता काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जास्तीत जास्त संसर्ग बाहेरच्या खाण्याने, पाणी पिण्याने होतो. त्यामुळे तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

1.पावसाळ्यात फळांचे सेवन करावे. पावसाळ्यात तुम्ही जांभूळ, पपई, सफरचंद, डाळिंब, पीच आणि नाशपाती यांसारखी फळे खाऊ शकता. या फळांपासून मिळणारे पोषण शरीराला संसर्ग, ऍलर्जी आणि सामान्य आजारांपासून दूर ठेवतो.

2. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भोपळा, ड्रायफ्रूट्स, भाज्यांचे सूप, बीट आणि टोफू यासारख्या गोष्टींचे सेवन करायला हवे. याशिवाय दररोज 7/8 तास पुरेशी झोप घेतली पाहिजे.

3. पावसाळ्यात नेहमी पाणी कोमट पाणी करूनच प्यावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. असे केल्याने पाण्यात असलेले बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट होतात. याशिवाय रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू प्यायल्याने हानिकारक विषाणू शरीरातून बाहेर पडतात.

4. पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाण्याची खूप इच्छा होते. पण आरोग्याची आवड असेल तर बाहेरचे खाणे टाळावे. स्ट्रीट फूड बनवताना स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही. अनेकवेळा ठेवलेले किंवा तळलेले भाजून खाल्ल्याने पोटाच्या समस्या निर्माण होउ शकतात.

5. पावसाळ्यात कच्चे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. या दिवसांमध्ये पचनसंस्था खूप मंद गतीने काम करते. त्यामुळे अन्न उशिरा पचते. पावसात बाहेरचा ज्यूस आणि सॅलड खाणे टाळा. 

6. पावसाळ्यात मीठाचे सेवन कमी कचवीनुसार ठेवावे. मीठ शरीरात सोडियमचे प्रमाण वाढविण्याचे काम करते. यामुळे भविष्यात उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो. उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेहाच्या रूग्णांनी देखील आहारात मीठ त्यानुसार घ्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT