Monsoon Driving Tips: पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. पण पावसाळ्यात आरोग्यासह गाडी चालवतांना देखील काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात तुम्ही कारने प्रवास करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमचा प्रवास देखील सुखकर होईल.
वेग कमी ठेवावा
जेव्हा तुम्ही पावसाळ्यात गाडी चालवत असता तेव्हा तुमच्या वाहनाचा वेग जास्त नसावा हे लक्षात ठेवा. तसेच, जवळून धावणाऱ्या वाहनांपासून अंतर ठेवावे. कारण ओल्या रस्त्यामुळे टायरची पकड कमी होते, ज्यामुळे ते घसरण्याची आणि नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते.
म्हणूनच तुम्ही तुमच्या वाहनाचा वेग कमी ठेवा आणि तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनापासून योग्य अंतर ठेवावे. जेणेकरून तुम्हाला अचानक ब्रेक लावावे लागला तर कोणतीही दूर्घटना होणार नाही.
वातावरणाचा अंदाज घ्यावा
मुसळधार पावसात, रस्त्यावर दूरपर्यंत दिसणे कठीण असते. यामुळे विंडशील्ड वाइपर आणि हेडलाइट्स योग्यरित्या कार्य करत आहे ना हा तपासावे. पावसाळ्यात कुठेही जाण्यापूर्वी गाडीची देखभाल करून घ्यावी. जर वायपर योग्यरित्या काम करत नसेल तर ते बदलले पाहिजेत. तसेच, प्रवास करताना तुमच्या वाहनाचे लाईट कमी बीमवर ठेवा. जेणेकरून जास्तीत जास्त दृश्यमानता मिळेल आणि समोरून येणाऱ्या वाहनचालकांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. जर कारच्या काचांवर धुके तयार होऊ लागले तर तुम्ही डीफॉगर देखील चालू करू शकता.
घाईगडबडीत गाडी चालवू नका
पावसाळ्यात अचानक वेग येणे, अचानक ब्रेक लागणे आणि अचानक वळणे यासारख्या कोणत्याही प्रकारच्या घाईघाईच्या गोष्टी करणे टाळावे. तसेच तुम्हाला उजवीकडे-डावीकडे वळावे लागेल, लेन बदलावी लागेल किंवा थांबावे लागेल तर इंडिकेटर द्यावे.
पाणी साचलेल्या रस्त्यावरून गाडी चावलतांना घ्या काळजी
जेव्हा गाडीचे टायर आणि रस्ता यांच्यामध्ये पाण्याची लाट निर्माण होते तेव्हा जपून गाडी चालवावी. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी, साचलेल्या पाण्यातून बाहेर पडणे टाळा किंवा जर तुम्ही बाहेर पडत असाल तर गाडीचा वेग अगदी कमी असावा. जेणेकरून कमी आणि लहान तरंग तयार होतील आणि तुम्हाला कमी त्रास सहन करावा लागेल. तसेच पाण्यातून बाहेर पडताना एक्सलेटर काढू नका व वाहन उजवीकडे व डावीकडे झुकण्याऐवजी सरळ दिशेने चालवा.
गाडी मेंटन ठेवावी
पावसाळ्यात गाडीची देखभाल करणे गरजेचे असते. म्हणूनच गाडीचे टायर, लाईट, ब्रेक नीट तपासून घ्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.