Enjoy delicious dessert in monsoon  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Dessert: स्वादिष्ट मिठाईचा घ्या आनंद

पावसाळ्याच्या (Monsoon) दिवसांत तुम्ही अनेक स्वादिष्ट तसेच चवदार मिष्टान्नचे देखील सेवन करू शकता .

दैनिक गोमन्तक

पावसाळ्यात पकोडे, समोसा आणि तळलेले सर्व पदार्थ आपण खात असतो. या वातावरणात तुम्ही अनेक स्वादिष्ट तसेच चवदार मिष्टान्नचे देखील सेवन करू शकता. अशा परिस्थितित तुम्ही गुलाब जामून ते मालपुवापर्यंत अनेक प्रकारची मिठाई घरीच बनवू शकता. जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या गोड पदार्थांचा आपण आस्वाद घेऊ शकतो.

* घेवर

घेवार हा पदार्थ एक राजस्थानी गोड पदार्थ आहे. श्रावण महिन्यात विशेष म्हणजे रक्षाबंधन आणि तीज या सणाच्या निमित्याने ही गोड पदार्थ खाणे पसंद करतात. हा पदार्थ देसी तुपात शिजवले जाते आणि साखरेच्या पाकात भिजवले जाते. घेवरमध्ये रबरी, मलाई, मावा आणि फळांचा समावेश असतो. हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे.

* रबडीसह मालपुवा

ही एक उत्तर भारतीय गोड पदार्थ आहे. जे पॅनकेकसारखे असते. ही गोड दूधासोबत किंवा रबडीसह दिल्या जाते. पावसाळ्यात तुमहि या पदार्थाचा आनंद घेऊ शकता.

* बालुशाही

बलुशाही हा गोड पदार्थ डोनटसारखा असतो. परंतु याची चव एकसारखी नसते. याची चव खूप चांगली असते. मैदापासून ही पदार्थ बनवलेले असते. त्यानंतर याला तुपामध्ये तळले जाते. तळल्यानंतर याला साखरेच्या पाकात टाकले जाते.

* शाही तुकडा

शाही तुकडा हा पदार्थ तळलेल्या ब्रेड आणि राबडीपासून तयार केली जाते. हा पदर्थ तयार करण्यासाठी आपल्याला दूध, साखर, वेलची पावडर, केसरच पाणी, वेलची आणि काही सुकामेवा यांची आवश्यकता असते.

* गुलाब जामुन

जेवण झाल्यानंतर गुलाब जामुन खाण्याची मज्जाच वेगळी असते. तसेच पावसाळ्यात हा पदार्थ खाण्याची मज्जा दुप्पटकहा होते. हा पदार्थ खवा,साखर आणि सुकामेवा टाकून बनवला जातो. नंतर याला साखरेच्या पाकात टाकून भिजवले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT