Monsoon Dengue Fever Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dengue Fever in Monsoon: पावसाळ्यात वाढतो डेंग्यूचा धोका! घ्या 'ही' खबरदारी

डेंग्यूमुळे खूप ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखतात. डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात.

Puja Bonkile

Monsoon Dengue Fever: पावसाळा सुरू झाला आहे आणि या दिवसांमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. साचलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्णही वाढतात. जे डासांचे उत्पत्तीस्थान बनते. 

डेंग्यूचा विषाणू संक्रमित एडिस डासांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. याचा जगभरातील लाखो लोकांवर परिणाम होतो.

ज्यामध्ये लहान मुले देखील या आझाराला बळी पडू शकतात. डेंग्यूपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे हा जाणून घेऊया.

  • डेंग्यूची लक्षणे कोणती (Dengue Fever Symptoms)

खूप ताप

तीव्र डोकेदुखी

सांधे आणि स्नायू दुखणे

पुरळ येणे

थकवा जाणवणे

  • स्वच्छता ठेवावी

डेंग्यूचा प्राथमिक स्त्रोत असलेल्या एडिस डासांची वाढ साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. तुमच्या घरात डासांच्या उत्पत्तीचा धोका कमी करण्यासाठी घरातील साचलेले पाणी काढून टाकावे. तसेच नाला आणि पाण्याचे नळ स्वच्छ करा.

  • कीटकनाशके वापरा

त्वचेचे डासांपासून रंक्षण करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट क्रीम लावल्याने डास चावण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. तुमच्या परिसरात किंवा घरात जास्त डास असतील तर मच्छर प्रतिबंधक वापरावे.

  • पूर्ण बाह्यांचे कपडे घाला

तुमच्या मुलांसोबत तुम्हीही लांब बाहींचा शर्ट, लांब पँट, मोजे घालावे. त्याचबरोबर हलक्या रंगाचे कपडे घालावे यामुळे डास जवळ येत नाही

  • खिडक्या आणि दारे बंद करा

घरात डास येऊ नयेत म्हणून खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावे. तसेच मच्छरदाणीचा वापर करावा. डासांपासून संरक्षण करण्याचे हे सर्वोत्तम मार्ग असू शकतात. तसेच, घरामध्ये थंड वातावरण राखण्यासाठी पंखे किंवा वातानुकूलन वापरा कारण थंड वातावरणात डासांची क्रिया कमी होते.

  • बाहेर जाणे टाळा

संध्याकाळी जेव्हा डास जास्त सक्रिय असतात तेव्हा बाहेर किंवा पाणी असलेल्या भागात जाणे टाळा. आवश्यक असल्यास, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि मच्छर प्रतिबंधक लावा.

  • डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

तुमच्या घरात जर एखाद्याला खूप ताप, डोकेदुखी किंवा सतत उलट्या होत असतील तर ते डेंग्यूचे लक्षण असू शकते. अशावेळी डेंग्यूची गंभीर वाढ होण्यापासून रोखण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इन्शाअल्लाह, मी संपूर्ण चेकपोस्ट उडवून देईन… दहशतवादी उझैदची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल; '005 ब्रिगेड' ग्रुपमध्ये रचला मोठा कट

आयएसआयसोबत बैठक अन् 22 दहशतवाद्यांची यादी! ऑपरेशन सिंदूरनंतर आता नवा खुलासा; POK मधील तळांबाबत जैश कमांडरची जाहीर कबुली

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

SCROLL FOR NEXT