Fungal Infections Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fungal Infections Monsoon: पावसाळ्यात होणारे फंगल इन्फेक्शन 'असे' थांबवा

पावसात भिजल्यामुळे किंवा जास्त वेळ पाण्यात राहिल्याने तुमच्या शरीरात फंगल इन्फेक्शन वाढु शकते.

Puja Bonkile

Fungal Infections In Monsoon: पावसाळा सुरू झाला असून अनेक आजार देखील सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका वाढत असतो. पावसात भिजल्यामुळे किंवा जास्त वेळ पाण्यात राहिल्याने शरीरात फंगल इन्फेक्शन होऊ शकतो. कधीकधी हे इनफेक्शन खूप वेदनादायक असतात.

  • पावसात फंगल इंफेक्शनपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

1. हायड्रेटेड रहा

पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील प्रदूषक बाहेर टाकण्यास मदत होते. जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहारामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे ते फंगल इन्फेक्शनला अधिक प्रतिरोधक बनते.

2. अँटीफंगल पावडर

त्वचा कोरडी ठेवण्यासाठी आणि इन्फेक्शनची वाढ रोखण्यासाठी तुम्ही अँटीफंगल पावडर वापरू शकता. विशेषतः ज्या भागात जास्त घाम येतो.

3. सैल कपडे

कॉटनचे कपडे घालावे जेणेकरून त्वचेला श्वास घेण्यास जागा मिळेल. सैल कपडे घालावे जेणेकरून हवा शरीरात जाईल. असे कपडे तुमची त्वचा कोरडी ठेवतात आणि बुरशीपासून संरक्षण करतात.

4. स्वच्छता

इन्फेक्शन टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले हात नियमितपणे अँटी फंगल साबणाने धुवावे. विशेषतः पावसात भिजल्यानंतर तुमची नखे लहान आणि स्वच्छ ठेवा जेणेकरून या पावसाळ्यात तुम्हाला संसर्ग टाळता येईल.

5. त्वचा कोरडी ठेवा

जास्त ओलावा असलेल्या त्वचेवर इन्फेक्शन वाढू शकते. जेव्हा तुम्ही पावसात भिजता तेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे कोरडे करून घ्यावे. बुरशीचा धोका हाताखाली, स्तन आणि पाय यांच्यामध्ये जास्त असतो, म्हणून हे भाग चांगले कोरडे करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Today's News Live: डिचोलीत बिबट्याची पुन्हा दहशत

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

SCROLL FOR NEXT