Monkeypox Virus News Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monkeypox विषाणूने अमेरिका, ब्रिटनमध्ये उडवली खळबळ, जाणून घ्या लक्षणे

Monkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणू संसर्गजन्यअसल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनानंतर आता मंकीपॉक्स या विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. या विषाणूमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्येही आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत एकूण 9 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय पोर्तुगाल आणि स्पेनमधूनही काही रुग्ण समोर आली आहेत. पश्चिम आफ्रिकन देशांतून परतणाऱ्या अशा लोकांच्या बाबतीत हे सहसा घडत असते. हा विषाणू किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे कोणती आहेत? हे जाऊन घेऊया. (Monkeypox Virus News)

* मंकीपॉक्स विषाणू संसर्गजन्य आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हे चेचक विषाणूच्या कुटुंबाशी संबंधित आहे. जरी ते फारसे गंभीर नसले तरी आणि तज्ञ म्हणतात की संसर्गाची शक्यता कमी आहे.

* हे मुख्यतः मध्य आणि पश्चिम आफ्रिकन देशांच्या दुर्गम भागात, उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या जवळ आढळते. व्हायरसचे दोन मुख्य प्रकार आहेत - पश्चिम आफ्रिकन आणि मध्य आफ्रिकन.

* ब्रिटनमधील दोन संक्रमित रुग्णांनी नायजेरियातून प्रवास केला होता, त्यामुळे त्यांना पश्चिम आफ्रिकेतील विषाणूचा त्रास झाला असावा. हे सहसा सौम्य असते.

* याची सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि अस्वस्थ वाटणे यांचा समावेश होतो.

* एकदा ताप सुटला की संपूर्ण शरीरावर पुरळ उठू शकते. हे पुरळ अनेकदा चेहऱ्यावर (face) सुरू होतात, नंतर शरीराच्या इतर भागात पसरतात, सहसा हाताचे तळवे आणि पायांच्या तळव्यावर अधिक पुरळ येतात.

* या पुरळांमुळे खाज येऊ शकते. नंतर त्याच्या वरची स्कीन खाली पडते. जखमाचे चट्टे बनू शकतात. संसर्ग सामान्यतः स्वतःहून निघून जातो आणि 14 ते 21 दिवसांपर्यंत हा आजार शरीरात राहतो.

* संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मंकीपॉक्स होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्ग किंवा डोळे, नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतो.

* माकड, उंदीर आणि खारू यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित व्यक्तींच्या वस्तूंना स्पर्श केल्यास त्याचा प्रसार होऊ शकतो.

* विषाणूची (Virus) बहुतेक प्रकरणे सौम्य असतात, कधीकधी चेचक सारखी असतात. काही आठवड्यांत ते स्वतःच बरे होतात.

* जरी मंकीपॉक्स कधीकधी अधिक गंभीर असू शकतो आणि पश्चिम आफ्रिकेत मृत्यूस कारणीभूत असल्याचे नोंदवले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT