मासिक पाळीत (Periods) महिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान सर्व महिलांना कोणत्या ना कोणत्या वेदना आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. यादरम्यान महिलांना डोकेदुखी, अंगदुखी, रक्तस्त्राव, निद्रानाश यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. या काळात महिला अनेक सामान्य चुका करतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (Common Mistakes Women Make During Their Periods)
* ब्लीच केलेल्या कॉटन पॅडचा वापर
मासिक पाळीत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी पॅडचा वापर केला जातो. बहुतेक टॅम्पन्स आणि पॅड रेयॉन, कॉटन किंवा दोन्हीच्या मिश्रणाने बनलेले असतात. यामध्ये घातक रसायने आणि कीटकनाशके वापरली जातात, त्यामुळे महिलांच्या फर्टिलिटीवर परिणाम होतो. एफडीएच्या मते, त्यात असलेले डायऑक्सिन योनीच्या ऊतींवर परिणाम करते. त्यामुळे योनीशी संबंधित इतर समस्याही होऊ लागतात. हे टाळण्यासाठी सेंद्रिय कापसापासून बनवलेले पॅड आणि टॅम्पन्स वापरा.
* पेनकिलरचे सेवन
महिलांना मासिक (Periods) पाळीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी महिला अनेकवेळा पेन किलरचे सेवन करतात. असे करणे महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, या काळात घेतलेली औषधे इतकी धोकादायक असतात की त्यांना हृदयविकाराचा झटकाही (Heart Attack) येऊ शकतो. या काळात वेदना टाळण्यासाठी औषधांऐवजी नैसर्गिक उपायांचा वापर करावा.
* पॅड किंवा टॅम्पन्स न बदलने
ज्या महिला (Women) सकाळी घेतलेले पॅड्स रात्री बदलत असेल तर त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे त्यातून निर्माण होणारे जीवाणू विषारी शॉक सिंड्रोम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी, पॅड किंवा टॅम्पॉन 4 ते 8 तासांच्या अंतराने बदलने गरजेचे आहे.
* स्वच्छता ठेवणे
या काळात स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असते. केवळ योनी वारंवार पाण्याने स्वच्छ करावी. रक्तस्रावामुळे दुर्गंधी येऊ शकते, परंतु हा संसर्ग नाही. उलट, साफसफाईमुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. साफसफाईसाठी बाजारातील उपलब्ध असलेले कोणतेही साबण किंवा उत्पादने वापरू नका.
* कॉफीचे अधिक सेवन
या काळात महिलांना झोप येत नाही, थकवा जाणवतो. यामुळे अनेक महिला कॉफीचे (Coffee) अधिक सेवन करतात. पण कॉफीमुळे शरीर डिहायड्रेट करते. यामुळे या काळात कॉफीचे सेवन करणे टाळावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.