Mobile Network: सध्या सर्व स्मार्टफोन्समध्ये 5G नेटवर्कची सेवा मिळत आहे. परंतु अनेक लोक नेटवर्कच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. अनेक दूरसंचार कंपन्या देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये अमर्यादित 5G सेवा देत आहेत, परंतु यासाठी 5G फोन असणे आवश्यक आहे. नेटवर्क असूनही स्लो इंटरनेटमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्कचा स्पीड कसा वाढवायचा हे जाणून घेऊया.
जर तुमचे इंटरनेट स्लो चालत असेल तर आधी मोबाइलची सेटिंग्ज चेक करावी. मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये नेटवर्क सेटिंग्जमध्ये जावे आणि preferred type of network ला 5G किंवा ऑटो सिलेक्ट करावे.
याशिवाय नेटवर्क सेटिंग्जमध्ये ऍक्सेस पॉइंट नेटवर्क (APN) सेटिंग देखील चेक करावी. कारण स्पीडसाठी योग्य APN असणे महत्त्वाचे आहे. APN सेटिंग्ज मेनूवर जा आणि सेटिंग डीफॉल्टवर सेट करा.
मोबाइलमध्ये सुरू असलेल्या सोशल मीडियावर लक्ष ठेवावं. Facebook, X आणि Instagram सारखे अॅप्स स्पीड कमी करतात आणि अधिक डेटा वापरतात. त्यांच्या सेटिंग्जमध्ये जा आणि ऑटो प्ले व्हिडिओ बंद करावे. तसेच मोबाइलचा ब्राउझर डेटा सेव्ह मोडमध्ये सेट करावा.
सर्वकाही करूनही तुम्हाला स्पीड मिळत नसेल तर तुमच्या मोबाइलची नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करावे. डीफॉल्ट नेटवर्क सेटिंग्जवर चांगली स्पीड मिळू शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.