Mint Leaves| health  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mint Leaves: उष्माघातावर 'पुदिना' रामबाण उपाय

उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे पानांचे सेवन करणे आरोग्यदायी असते.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचा वापर प्रामुख्याने दोन प्रकारे केला जातो. एक म्हणजे चटणी बनवण्यासाठी आणि दुसर म्हणजे जलजीरा बनविण्यासाठी वापरला जातो. पुदिन्याचे सेवन आरोग्यदायी असते. पुदीना अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असते. यामुळे पोटासंबंधित असलेले आजार दूर राहतात. पुदिन्याचे (Mint Leaves) नियमित सेवन केल्याने उन्हाळ्यात अनेक समस्यांना दूर ठेवता येते. (Mint Leaves summer benefits news)

* उष्माघात

कडक उन्हामुळे (Summer) उष्माघात होऊ शकते. यामुळे उलट्या, जुलाब, अशक्तपणा आणि अस्वस्थता यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला जलजीरा किंवा आंब्याचे पान प्यावे.

* संसर्ग वाढणार नाही

उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरचे अन्न खाणे किंवा फास्ट फूड खाल्याने अनेक समस्या निर्माण होतात.म्हणून दररोज जेवणात पुदिन्याची चटणी खाल्याने पोटदुखीची समस्या कमी होऊ शकते.

* डोकेदुखी

उन्हाळ्यामध्ये अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे तुम्ही पुदिन्याच्या पानांचा चहा बनवून रोज सकाळी सेवन करू शकता. यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल. उन्हाळ्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा पुदिनाची पेस्ट घेऊन ती एक ग्लास पाण्यात विरघळवून त्यात लिंबू, काळे मीठ, भाजलेले जिरे मिसळून पेयाचे सेवन करू शकता.

* मळमळ

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, अपचन किंवा उष्माघाताच्या प्रभावामुळे मळमळण्याची समस्या अधिक असते. अशा वेळी पुदिन्याची 5-6 पाने घेऊन त्यावर चिमूटभर काळे मीठ टाकून हळूवार चावून खावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

गोव्याचा फिरकीपटू मोहित रेडकर बीसीसीआय शिबिरात, हरभजन सिंग देणार 'गुरुमंत्र'

Indian Super League 2026: एफसी गोवा कोलकात्यात पुन्हा वरचढ? ईस्ट बंगालविरुद्ध रंगणार आयएसएल फुटबॉल सामना

IND vs ENG Pitch Report: "वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?" ओपनर्सचा धमाका की स्विंगचा तडाखा; हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये टॉस ठरणार गेम चेंजर

SCROLL FOR NEXT