Mint Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mint Benefits: उन्हाळ्यात पुदिन्याची पाने त्वचेसाठी ठरतात वरदान; होतात हे '5' फायदे

पुदिना शरीराला थंडावा देतो

दैनिक गोमन्तक

Mint Benefits: उन्हाळा सुरू झाला आहे. या ऋतूत शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यात अन्न आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शरीराला पोषक आणि थंडावा देणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे. या ऋतूत उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो.

उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक अनेक प्रकारची पेये वापरतात. उन्हाळ्यात पुदिन्याची मागणीही वाढते. पुदिना शरीराला थंडावा देतो. पुदिना अनेक प्रकारे वापरला जातो. आज आम्ही तुम्हाला पुदिन्याचे फायदे सांगणार आहोत.

1. पचनासाठी फायदेशीर:

पुदिना पचनाच्या समस्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जिरे, काळी मिरी आणि हिंग मिसळून पुदिना खाल्ल्यास पोटदुखीमध्ये आराम मिळतो. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.

2. त्वचेचे पोषण करते:

पुदीना त्याच्या थंड प्रभावासाठी ओळखला जातो. काकडींप्रमाणेच पुदिनाही त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी उपयुक्त आहे. पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला ताजेपणा आणि ओलावा येतो. पुदिन्याच्या पानांचा रस दही किंवा मधात मिसळून लावल्यास खूप फायदा होतो आणि त्वचा चमकते.

3. प्रतिकारशक्ती वाढते:

लिंबू आणि नारळ पाण्यात पुदिना मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल चांगली राहण्यास मदत होते. हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याचे काम करते.

4.रक्तदाबात फायदेशीर:

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी पुदिना फायदेशीर आहे. या रुग्णांनी पुदिन्याचे सेवन केल्यास रक्तदाब कमी करण्यास मदत मिळते. सॅलडमध्ये टाकून आयन याचे सेवन करू शकतो.

5. खोकला आणि सर्दीमध्ये फायदेशीर:

पुदिन्यापासून अनेक पेयेही तयार केली जातात. पुदिन्यापासून बनवलेले पेय उष्णतेपासून आराम देतात. पुदिना बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. पुदिन्याच्या चहामुळे सर्दी तसेच खोकल्यापासून आराम मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT