World Diabetes Day 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes: मानसिक ताणामुळेही मधुमेह होऊ शकतो का? काय सांगतंय संशोधन

Mental Stress: मधुमेह हा भारतातील वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आहे. आपल्या देशात हा आजार ज्या वेगाने पसरत आहे, तो चिंतेचा विषय आहे.

Manish Jadhav

मधुमेह हा भारतातील वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आहे. आपल्या देशात हा आजार ज्या वेगाने पसरत आहे, तो चिंतेचा विषय आहे. जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही तेव्हा रक्तात ग्लुकोज जमा होऊ लागते, ज्यामुळे मधुमेह होतो. हा एक क्रॉनिक आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा जास्त होते. हा आजार केवळ गोड पदार्थ किंवा आहारामुळे होत नाही तर तणावामुळे देखील होतो. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, हा आजार मानसिक ताणामुळे देखील होत आहे. अशा परिस्थितीत आपण तणाव टाळणे आवश्यक आहे.

कॉर्टिसोल हार्मोन

तणावादरम्यान, शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि साखर अनियंत्रित होते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यामागे कुटुंब, कामाचा ताण आणि वैयक्तिक समस्या हे प्रमुख घटक आहेत. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी काही उपाय आहेत, ज्यांचा अवलंब करुन तुम्ही मधुमेह टाळू शकता आणि निरोगी राहू शकता.

मानसिक ताण

मानसिक ताण हा आज लोकांसाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे. ताणतणावामुळे अनेक आजार आपल्याला घेरतात. यामध्ये मधुमेह प्रथम येतो. आजकाल ताणतणावामुळे मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मानसिक ताण टाळण्यासाठी आपण सतर्क राहण्याची गरज आहे.

डॉक्टरांचा सल्ला

आजकाल मधुमेहाबद्दल ऐकताच लोक घाबरतात. लोकांना असे वाटते की, हा आजार कुठेतरी त्यांचा पाठलाग करत आहे. मधुमेहाच्या रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधे घ्यावीत. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय मधुमेहाचे कोणतेही औषध घेऊ नये.

आहार आणि दिनचर्येत सुधारणा

जर आपल्याला मधुमेह (Diabetes) टाळायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला संतुलित आहार घ्यावा लागेल. ज्यामध्ये फायबर, प्रथिने आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ समाविष्ट आहेत. याद्वारे आपण मधुमेहासारखे आजार टाळू शकतो. याशिवाय, तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारणे देखील महत्त्वाचे आहे. याचा अर्थ सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंतच्या तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सुधारणा करणे आवश्यक आहे. वेळेवर जेवण्यात जास्त गोड पदार्थ, तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ टाळणे आणि तणावमुक्त जीवन जगणे समाविष्ट आहे. जर आपण जास्त ताण घेतला तर मधुमेह आपला पाठलाग करत राहील.

नियमित व्यायाम

दररोज योगासने, ध्यानधारणा आणि 30-45 मिनिटे व्यायाम केल्याने ताण कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रित होते. शक्य असल्यास, जास्त चालावे. मधुमेहाच्या रुग्णांनी केवळ त्यांच्या शारीरिक आरोग्याचीच नव्हे तर मानसिक आरोग्याचीही विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. नियमित दिनचर्या आणि निरोगी जीवनशैलीने साखर नियंत्रित करता येते आणि ताण टाळता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT