Men's Skin Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Men's Skin Care: दाढी केल्यानंतर पुरूषांनी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी?

दाढी केल्यावर अनेकदा पुरूषांच्या चेहऱ्यावर खाज किंवा पिंपल येते. यांमुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Men's Skin Care: अनेक पुरूष आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शेव्हिंग करतात. शेव्ह केल्यानंतर त्वचा अगदी कोरडी पडते. तर काही लोकांना खाज आणि पिंपल्सची समस्या जाणवते. तर काही लोकांचे चेहरे लाल होतात.

पण या समस्या कमी करायच्या असेल तर तुम्ही काही घरगुती वस्तु लावून करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की पुरूष चेहऱ्यावर काय लावू शकता.

  • बर्फ लावा

पुरूषांनी शेव्हिंग केल्यानंतर चेहऱ्यावर बर्फ चोळावा. यासाठी एक बर्फाचा तुकडा घ्यावा आणि जळजळ होत असलेल्या भागावर चोळावे. तसेच यामुळे खाज देखील कमी होईल.

  • खोबऱ्याचे तेल

शेव्हिंग केल्यानंतर खोबरेल तेल लावल्यास बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होते. त्वचा आतून हायड्रेट राहते. तसेच चेहऱ्यावरील खाज थांबवते. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.

  • तुरटी लावावी

दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी लावावी. तसे तर ही पद्धत खूप जुनी आहे. नेहमीच पुरूष याचा वापर करतात. तुरटीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे दाढी केल्यानंतर मुरुमांपासून बचाव करतात.यामुळे दाढी केल्यानंतर तुरटी लावावी.

  • कोरफड जेल

शेव्हिंग केल्यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावावे. कोरफड तुमच्या चेहऱ्याला आतून हायड्रेट करण्यास आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. तसेच त्वचेवर होणारी जळजळ कमी करते. त्यामुळे शेव्हिंग केल्यानंतर थोडे कोरफड जेल घ्या, त्यात कोमट पाण्यात मिसळा आणि चेहऱ्याला लावा.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT