Matar Makhana  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Matar Makhana Recipe: मटर पनीर खाऊन बोर झालात? मग ट्राय करा मटर मखाना, लगेच नोट करा रेसिपी

मटर मखाना स्वादिष्ट आणि चवदार असून बनवायला देखील सोपी आहे.

Puja Bonkile

Matar Makhana Recipe: जर तुम्ही मटर पनीर खाऊन कंटाळला असाल तर काही तरी नवीन करून पाहा. अनेक लोक घरीच मटर पनीर बनवतात. पण तुम्हाला नवीन पदार्थ बनवण्याची आवड अशेल तर तुम्ही मटर मखाना ट्राय करू शकता. मटर मखाना स्वादिष्ट आणि चवदार असून बनवायला देखील सोपी आहे. तुम्ही गरम भात,नानसोबत या भाजीचा आस्वाद घेऊ शकता.

  • मटर मखाना बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मखना - 1 कप

वाटाणा - 1/2 कप ताजे

कांदा - 1 बारीक चिरलेला

टोमॅटो - 2 बारीक चिरलेला

आले-लसूण पेस्ट - 1 टीस्पून

हिरवी मिरची - 1 बारीक चिरलेली

मलई किंवा मलाई - 1/4 कप

गरम मसाला - 1/2 टीस्पून

हळद - 1/2 टीस्पून

लाल मिरची पावडर - 1/2 टीस्पून

तेल किंवा तूप - 2 टेबलस्पून

धने पावडर - 1 टीस्पून

जिरे - 1/2 टीस्पून

कसुरी मेथी - 1/2 टीस्पून

मीठ चवीनुसार

  • मटर मखाणा बनवण्याची कृती

मटर मखाणा बनवण्यासाठी सर्वात पहिले कढईत थोडे तूप गरम करून मखणा सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. नंतर एका कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरे, कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यावे. नंतर कांदा सोनेरी झाल्यावर त्यात टोमॅटो, हळद, लाल तिखट आणि धने पावडर घालून चांगले परतून घ्या. मसाला चांगला भाजला की मटर आणि मखणा घालावा. नंतर थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ घाला आणि 10-12 मिनिटे शिजवा.
मटार आणि मखना चांगले शिजल्यावर क्रीम घालावे आणि आणखी 2-3 मिनिटे शिजवावे.
शेवटी गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून मिक्स करावे. गरमागरम रोटी किंवा भाताबरोबर तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT