Kitchen Hacks: भाजीत तेल जास्त झालय? तर हे उपाय नक्की ट्राय करून बघा

तेलकट आणि मसालेदार भाज्या खाल्याने लठ्ठपणा आणि हाय कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
Kitchen Hacks
Kitchen HacksDainik Gomantak

Kitchen Hacks: तेलकट आणि मसालेदार भाज्या खाल्याने लठ्ठपणा आणि हाय कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. अनेक वेळा घाईत भाजी शिजवताना जास्त तेल टाकले जाते. काही लोक हे जाणूनबुजून करतात, कारण त्यांना वाटते की जास्त तेलाने ग्रेव्ही चांगली बनते, पण तसे नाही. 

तेलकट भाज्या खाल्याने लठ्ठपणा आणि हाय कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे जेवणात शक्यतो कमी तेलाचा वापर करावा. जर जास्त तेल झाले तर काय करावे हे जाणून घेऊया.

  • टिश्यू पेपर

टिश्यू पेपरच्या मदतीने तुम्ही भाजीमध्ये जास्त झालेले तेल कमी करू शकता. टिश्यू पेपरमध्ये कोणताही द्रव पदार्थ शोषुन घेण्याची क्षमता असेत. ज्यामुळे ते भाजीतील अतिरिक्त तेल काढून टाकू शकते.

  • ब्रेड

ब्रेडमध्ये तेल शोषण्याची क्षमता असते. भाजीमधले अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी तुम्ही ब्रेड वापरू शकता. यासाठी तुम्ही ब्रेडचे मोठे तुकडे भाजीमध्ये टाकावे. काही मिनिटांनंतर ब्रेड तेल शोषून घेईल. त्यानंतर, तुम्ही ब्रेड चमच्याने काढून फेकून देऊ शकता.

  • दही किंवा ताक

जर भाजीमध्ये तेल जास्त झाले तर तुम्ही दद्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही भाजीमध्ये दही किंवा ताक घालू शकता. त्यामुळे तेल कमी होईल.

Kitchen Hacks
Kitchen Hacks: असे स्टोअर करा 'Dry Fruits', वर्षानुवर्ष होणार नाही खराब
  • फ्रीजमध्ये ठेवा

जर तुमच्या भाजीमध्ये तेल जास्त झाले असेल तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवावी. तेलामध्ये फॅट असते आणि थंड वातावरणामुळे फॅट घट्ट होते. म्हणून भाजीला फ्रिजमध्ये ठेवल्यास तेल कमी होईल. त्यानंतर आपण ते वेगळे करू शकता.

  • बर्फ

भाजीमधील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी तुम्ही बर्फाच्या तुकड्यांचा वापर करू शकता. बर्फांचे काही तुकडे ग्रेव्हीमध्ये ठेवावे. यामुळे तेल त्याला चिकटून राहते आणि तुम्ही ते ग्रेव्हीमधून सहज तेल कमी करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com