Durga Ashtami 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Durga Ashtami 2023: दुर्गाष्टमीच्या दिवशी 'या' 5 गोष्टी नक्की कराव्या

अष्टमीला दुर्गा देवीच्या गौरी रूपाची पूजा केली जाते.

दैनिक गोमन्तक

Masik Durga Ashtami 2023: आज 29 जानेवारी हा रविवार आणि माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमीला दुर्गा देवीच्या गौरी रूपाची पूजा केली जाते. कोणत्याही दिवशी देवीच्या मंदिरात लाल रंगाचा ध्वज अर्पण करणे शुभ मानले जाते.

अष्टमीच्या दिवशी विवाहित महिलांनी गौरीला लाल ओढणी अर्पण केल्यास पतीचे वय वाढते. या दिवशी मातेला लाल ओढणी अर्पण करावी. तुमची इच्छा असेल तर या दिवशी आरती आणि पूजेच्या वेळी दुर्गा मातेला पाच प्रकारची सुकी फळे लाल ओढणीत ठेवून अर्पण करा.

अष्टमीच्या दिवशी मातेच्या मंदिरात (Temple) जाऊन लाल ओढणीत बताशे आणि नाणी मिसळून देवीला अर्पण करा. यासोबतच देवीला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा. विवाहित महिलेला (Women) चांदीचे नाणे, चांदीचा कुंकवाचा करंडा, पैंजण, अंबे मातेची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे आणि इतर भेटवस्तू देऊ शकता.

दुर्गेची आपल्या परिवारावर कृपा राहावी

  • शनि मुक्तीसाठी पूजा करा

अष्टमी आणि नवमी तिथीवरही शनीचा प्रभाव असतो. या दिवशी मातेचे पूजन केल्याने शनिदेवाच्या प्रभावापासून मातेचे रक्षण होते.

  • संधी पूजा करा

या दिवशी संधिकालात 108 दिवे प्रज्वलित केल्याने जीवनातील अंधार नाहीसा होतो. यामुळे माता गौरी तसेच माता सिद्धिदात्री प्रसन्न होतात. 

  • पिंपळाची पाने

अष्टमीच्या दिवशी 11 पिंपळाची पाने घ्या. त्यावर रामाचे नाव लिहा, पानांची माळ करून मारुतीला अर्पण करा. यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि संपूर्ण वर्ष चांगले जाते.

  • धन-समृद्धीसाठी

स्थिर लक्ष्मी मिळविण्यासाठी सुपारीच्या पानात सात गुलाबाच्या (Rose) पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा, असे सांगितले जाते.

  • मनोकामना पूर्ण करण्यासाठी

अष्टमीमध्ये माता दुर्गेची पूजा करण्यासाठी लाल रंगाच्या घोंगडीवर बसणे खूप शुभ मानले जाते. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT