Makki ki Roti Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makki ki Roti: लठ्ठपणा कमी करण्यापासून ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यापर्यंत मक्याची रोटी फायदेशीर

Makki ki Roti: मक्यामध्ये बीटा-कॅरोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यासह अनेक पोषक घटक असतात. यामुळे मक्याची रोटी काणे आरोग्यदायी असते.

Puja Bonkile

Makki ki Roti: हिवाळ्यात मक्याची रोटी खाणे फायदेशीर असते. चवीव्यतिरिक्त, हे आरोग्यासाठी देखील चांगले असते. मक्यामध्ये बीटा-कॅरोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यासह अनेक पोषक घटक असतात. मक्की की रोटी खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे चांगले आहे. हिवाळ्यात मक्याची रोटी खाण्याचे पुढील पाच महत्वाचे फायदे आहेत.

मक्याची रोटी आरोग्यदायी

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

मक्याच्या रोटीमध्ये फायबर असते. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. अशावेळी हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

वजन नियंत्रणात राहते

मक्याच्या रोटीमध्ये उच्च फायबर असतात. ज्यामुळे एखाद्याला लवकर भूक लागत नाही. मक्याची रोटी खाल्ल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

डोळ्यांचे आरोग्य

डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मक्याची रोटी खाणे फायदेशीर आहे. मक्क्याची रोटी खाल्ल्याने बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए मिळते. जे निरोगी डोळ्यांसाठी चांगले असते.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मक्याची रोटी खाणे फायदेशीर आहे . मक्यामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे इंसुलिन संतुलित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिन संतुलित करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते.

बद्धकोष्ठता

पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मक्याची रोटी खाणे फायदेशीर असते. यामध्ये भरपूर फायबर असते जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी चांगले असते. हे गॅस आणि अपचनासाठी देखील चांगले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT