Makeup Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makeup Tips: तुमच्या मेकअप किटमध्ये 'हे' मल्टीटास्किंग प्रोडक्ट असल्यास पैशांची होईल बचत

Makeup Tips: तुमच्या मेकअप किटमध्ये मल्टीटास्किंग प्रोडक्ट असेल तर मेकअप करण्यास वेळ लागणार नाही.

Puja Bonkile

makeup tips fashion beauty multitask makeup products saving your money

मेक-अप प्रोडक्टमुळे किट जड होते आणि पैसे देखील खर्च होतात. अनेक वेळा वेळा गरज नसलेले प्रोडक्ट देखील किटमध्ये ठेवतो. जेव्हाही तुम्हाला काजल किंवा लिप लाइनर शोधावी लागते तेव्हा बराच वेळ वाया जातो. प्रथम, मेकअप प्रोडक्ट देखील खूप महाग आहेत.

फक्त दोन ते चार गोष्टी खरेदी केल्याने मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होऊ शकते. बाजारात अनेक मल्टीटास्किंग प्रोडक्ट मिळतात. ते खरेदी केल्यास तुम्हाला इतर मेकअप प्रोडक्ट खरेदी करण्याची गरज पडणार नाही.

कॉन्टूर हायलाइटर स्टिक

तुम्ही अनेकदा कॉन्टूरिंग आणि हायलाइटर वापरत असाल तर अशा प्रोडक्टमध्ये गुंतवणूक करा जे दोन्ही करू शकतात.

लिक्विड लिपस्टिक

तुम्ही लिक्विड लिपस्टिक फक्त ओठांवरच नाही तर ब्लशप्रमाणे गालावरही लावू शकता. ही आयडिया न्यूड शेड्ससह चालणार नाही, परंतु आपण ब्लश म्हणून गुलाबी, लाल, पिच शेड्स सहजपणे वापरू शकता. यामुळे तुम्हाला वेगळे ब्लश खरेदी करावे लागणार नाही.

बीबी क्रिम

बीबी क्रीम चेहऱ्यावरचे छिद्रे झाकण्यासोबतच तुम्हाला स्मूथ फिनिशिंगही देते. त्वचेवर फाउंडेशन आणि प्राइमरचे दोन किंवा तीन थर लावण्याऐवजी, त्वचेच्या टोनशी जुळणारे बीबी क्रीम लावून पैशाची बचत करू शकता.

फाउंडेशन

मॅट फिनिशिंगसाठी हे प्रोडक्ट वापरू शकता. जे तुमची 4 कामे एकाच वेळी करू शकतात. प्राइमर, कन्सीलर, मॅटीफायिंग पावडर आणि बीबी क्रीम या 4 प्रोडक्टऐवजी तुम्ही फक्त एकच प्रोडक्ट घेऊ शकता. हे चेहऱ्यावरचे छिद्र झाकते, डाग लपवते आणि त्वचेला मॅट कव्हरेज देऊन मेकअप प्रोफेशनल दिसतो.

काजल लाइनरची जोडी

हे कॉम्बिनेशन नेहमीच हिट राहिले आहे. तुम्ही या प्रोडक्टमुळे पैसे आणि वेळ देखील वाचवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT