Makeup Hacks: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makeup Hacks: घाईगडबडीत जास्त मस्करा लागल्यास काय कराल?

Makeup Hacks: घाईगडबडीत मस्करा जास्त लागला तर कसे काढाल हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

makeup hacks remove extra mascara from your eyelids

अनेकवेळा ऑपफिसला जायला किंवा एखाद्या कार्यक्रमात जायला उशीर झाल्यास महिला घाईघाईत मेकअप करतात. पण यामुळे मेकअपच्या अशा चुका होतात की त्या दूर करण्यासाठी कोणताही उपाय सापडत नाही. अनेक वेळा संपूर्ण मेकअप काढून पुन्हा लावावा लागतो.

यामुळे वेळोवेळी मेकअप प्रोडक्ट वाया जातात. त्यामुळे घाईमुळे किंवा योग्य माहितीच्या अभावामुळे जर तुम्ही जास्त मस्करा लावत असाल तर ते कसे दुरुस्त करावे हे जाणून घेऊया.

खोबरेल तेल

जेव्हा तुम्ही पापण्यांवर जास्त मस्करा लावला असेल तेव्हा ते काढण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घ्यावे. अतिरिक्त मस्करा काढण्यासाठी त्यात इअरबड्स बुडवा आणि हलक्या हाताने पापण्यांवर लावावे. पापण्या जास्त दाबू नका. यामुळे डोळ्यांचा संपूर्ण मेकअप खराब होऊ शकतो.

गुलाबजल

गुलाबजलचा वापर पापण्यांवरील अतिरिक्त मस्करा काढण्यासाठी देखील करू शकता. यासाठी इअरबड्समध्ये थोडे गुलाबपाणी लावा आणि त्याच्या मदतीने पापण्यांवरील अतिरिक्त मस्करा काढून टाका. यामुळे डोळ्यांचा मेकअफ देखील खराब होणार नाही.

इतर टिप्स

अतिरिक्त मस्करा काढण्यासाठी डोळे जोरात दाबू नका कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

फाउंडेशन आणि ओठांचा मेकअप काही क्षणासाठी तुम्ही घाई करत असाल, पण डोळ्यांचा मेकअप हळूहळू करा.

डोळ्यांशी संबंधित कोणतीही प्रोडक्ट असेल तर निकृष्ट दर्जाची खरेदी करू नका. केवळ दर्जेदार मेकअप प्रोडक्ट वापरावे.

मस्करा लावताना ब्रश नेहमी बाजूने एकदाच पुसून टाकावे, यामुळे ब्रशवरील अतिरिक्त द्रव निघून जाईल. नेहमी मस्कराचे दोन कोट लावावे. यामुळे डोळे आकर्षक दिसतात.

या टिप्सच्या मदतीने तुम्ही मस्करा योग्य प्रकारे लावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT