

मडगाव: खून झाल्यामुळे बंद ठेवण्यात आलेली घोगळ येथील सुन्नी गुलिस्तान मशीद अखेर खुली करण्याचा निर्णय शेवटी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी घेतला.
रमजान निमित्त प्रार्थना करण्यास मिळावे यासाठी ही सील मशीद खुली करावी अशी मागणी स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यासाठी सायंकाळी दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी स्थानिक आणि पोलिस अधिकारी यांची बैठक झाली होती.
यावेळी स्थानिकांनी मशिदीजवळ संपूर्ण शांत स्थिती ठेवण्याचे तर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी मशीद व्यवस्थापन समितीच्या वादातून मशीद समितीचे उपाध्यक्ष अली खानजादे याचा खून करण्यात आला त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव या मशिदीला सील ठोकले होते.
हे सील खोलण्याचा आदेश देताना जिल्हाधिकाऱ्यांनी या आवारात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच प्रार्थनांचा वेळी पोलिसांनी मशिदीच्या आवारात पुरेसा बंदोबस्त ठेवावा, असेही दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
सुरक्षाविषयक व्यवस्था योग्य प्रकारे राबवली जाते की नाही, यावर मामलेदारांनी नजर ठेवावी, असे जिल्हाधिकरी एग्ना क्लिटस यांनी आदेशात म्हटले आहे.
या मशीद आवारात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि हे चित्रीकरण किमान ३० दिवसांपर्यंत जपून ठेवावे, असेही या आदेशात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.