Tiranga Paratha Recipe: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tiranga Paratha Recipe: प्रजासत्ताक दिन बनवा खास तिरंगा पराठासोबत, वाचा ही खास रेसिपी

प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीतरी खास बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी ट्राय करु शकता.

दैनिक गोमन्तक

Republic Day Special Recipe: संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज आहे. देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हालाही तुमच्या स्वयंपाकघरात तिरंग्याची काही रेसिपी ट्राय करायची असेल तर झटपट तिरंगा पराठा बनवा. हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये पराठ्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही तिरंगा पराठा तयार करून हा प्रजासत्ताक दिन खास बनवू शकता.

तिरंगा पराठा बनवण्यासाठी साहित्य -

पराठ्याच्या केशर भागासाठी

  • अर्धी वाटी गव्हाचे पीठ

  • एक चतुर्थांश वाटी गाजर प्युरी

  • चवीनुसार मीठ

पराठ्याच्या हिरव्या भागासाठी

  • अर्धी वाटी गव्हाचे पीठ

  • पाऊण वाटी मटार प्युरी

  • चवीनुसार मीठ

पराठ्याच्या पांढऱ्या भागासाठी

  • अर्धी वाटी गव्हाचे पीठ

  • चवीनुसार मीठ

  • तिरंगा पराठा बनवण्याची पद्धत

तिरंगा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये वेगवेगळे बारीक करुन घ्या.

गाजर आणि मटारची प्युरी तयार करुन बाजूला ठेवा.

यानंतर एका भांड्यात पीठामध्ये गाजर प्युरी आणि मीठ एकत्र करून मळून घ्यावे.

दुसऱ्या भांड्यात मटारची प्युरी आणि मीठ पिठात मिसळून वेगवेगळे मळून घ्या.

त्यानंतर त्याच भांड्यात मीठ घालून साधे पीठ मळून घ्या.

आता तुमच्याकडे तिन्ही रंगांचे वेगवेगळे पीठ आहेत.

आता तिन्ही पिठांचा एक छोटासा भाग घ्या आणि ते एकमेकांना सारखे दाबा.

पीठ तिरंग्यासारखे कापून घ्या. गोळे पराठ्याच्या आकारात लाटून घ्या.

गरम तव्यावर तेल लावून पराठा बेक करा.

तुमचा चविष्ट तिरंगा पराठा तयार आहे.

गरमागरम पराठा चटणी, लोणचे किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT