Breakfast Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast Recipe: अर्धी वाटी पोहे अन् रव्यापासून बनवा 10 मिनिटांत टेस्टी नाश्ता

रोज नाश्तात पोहे आणि उपमा खाऊन बोर झाले असला तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता.

Puja Bonkile

Breakfast Recipe: रोज सकाळी नाश्तात काय बनवावे हा महिलांना पडलेला मोठा प्रश्न असतो. नाश्त्यात रोज सकाळी पोहे आणि उपमा खाऊन तुम्हीही बोर झाले असला तर आज तुम्हाला आम्ही एक नवी रेसिपी सांगणार आहोत. रवा आणि पोहेपासून तयार होणारी हि रेसिपी बनवायला सोपी असून टेस्टी देखील आहे.चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी बनवण्याची कृती काय आहे.

  • आंबोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

अर्धा वाटी पोहे

अर्धा वाटी रवा

2 चमचे दही

सोडा

बटर

मीठ

  • कृती

आंबोळी बनवण्यासाठी सर्वात पहिले पोहे स्वच्छ धुवावे. नंतर रवा आणि पोहे मिक्सरमध्ये थोडे मीठ, दही टाकून बारिक करून घ्यावे. नंतर थोडे पाणी टाकून पुन्हा एकदा एकजीव सारण तयार करावे. हे सारण थोडावेळ झाकून ठेवावे. नंतर सोडा टाकावा. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर तवा गरम करायला ठेवावा. डोसाप्रमाणे सारण तव्यावर टाकावे. वरून बटर किंवा तुप लावू शकता. यामुळे त्याला अधिक चव येते. नाश्तासाठी गरमा गरमा आंबोळी तयार आहे.

  • कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कढीपत्ता

लसूण- 4 ते 5

डाळव- अर्धा वाटी

मिरची - 1

साखर - चवीनुसार

मीठ - चवीनुसार

  • कृती

कढीपत्ता चटणी बनवण्याठी सर्वात पहिले कढीपत्ता, दही, डाळव, मीर्ची, लसूण, थोडी साखर पाणी टाकून मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे. नंतर या मिश्रणामध्ये जीरे, मोहरी, कोथिंबर टाकून फोडणी टाकावी. यामुळे या चटणीची चव अधिक वाढते.आंबोळीसह तुम्ही या चटणीचा आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT