Makar Sankranti  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makar Sankranti: मकर संक्रांतीला बनवलेली खिचडी ठरते आरोग्यदायी

दैनिक गोमन्तक

Khichdi benefits in Makar Sankranti: कोरोना विषाणूच्या पुन्हा पसरत असतांना अनेक सण देखील साजरे होत आहेत. विशेष पदार्थांशिवाय कोणताही सण पूर्ण होत नाही. प्रत्येक सणासाठी एक खास रेसिपी असते. 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे. या दिवशी लोक आपल्या घरी स्वादिष्ट खिचडी बनवतात आणि चवीने खातात.

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी का खाल्ली जाते ? एका प्रचलित समजुतीमुळे मकर संक्रांतीला खिचडी सण असेही म्हणतात. तांदूळ हे चंद्राचे प्रतीक मानले जाते, उडीद डाळ हे शनिचे प्रतीक मानले जाते आणि भाजीला बुधाचे प्रतीक मानले जाते. हे सुपरफूड तुमच्या ग्रहांची स्थिती मजबूत ठेवण्यास मदत करेल असे मानले जाते.

खिचडी हा भारतातील (India) प्रत्येक भागात खाल्ला जाणारा पदार्थ आहे. हा पदार्थ बनवायला सोपा असून आरोग्यदायी देखील आहे. सहसा खिचडी ही डाळ आणि चाळ घालून बनवली जाते पण त्यात चव आणि पौष्टिकता आणण्यासाठी तुम्ही काही भाज्या आणि तूप वापरू शकता. खिचडी पचायला सोपी आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी ही एक चांगली डिश आहे.

  • पचनसंस्था चांगली राहते

खिचडी हा खरोखरच उच्च पोषण आहार आहे. विविध भाज्या आणि कडधान्ये आणि तांदूळ यांच्या मिश्रणापासून बनवलेल्या खिचडीमध्ये तुमच्या शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने , कार्बोहायड्रेट, फायबर, निरोगी चरबी यासह संतुलित मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतात.

आयुर्वेदिक महत्व

खिचडी ही अशीच एक डिश आहे जी सहज पचते. खिचडीमध्ये तांदूळ आणि मसूर हे एकमेव मुख्य घटक आहेत. ज्यामुळे ते सहज पचते. इतर अन्नपदार्थ खाताना तुमच्या आतड्यांच्या भिंतींमध्ये जी चिडचिड होते, ती खिचडी खाताना होत नाही. खिचडी ही अतिशय हलकी खाद्यपदार्थ आहे. यामुळेच डॉक्टर लहान मुलांना, वृद्धांना आणि आजारातून बरे होत असल्यास त्यांना खिचडीचा सल्ला देतात.

  • रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

प्राचीन काळापासून खिचडीचे सेवन केले जाते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. आपल्या शरीरातील उर्जा संतुलित करते असे मानले जाते. खिचडीला त्रिदोष म्हणून ओळखले जाते कारण त्यात तीन घटक किंवा तीन दोष संतुलित करण्याची क्षमता असते.

  • वजन नियत्रणात राहते

कॅलरी आणि फॅट कमी असल्याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी खिचडी हा एक चांगला पर्याय आहे . हे शरीराद्वारे सहज पचले जाते आणि त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. जर तुमचे वजन कमी होत असेल तर तुमच्या आहारात खिचडीचा नक्कीच समावेश करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT