Main Causes Of Back Pain: अनेक लोकांना बैठे काम केल्यामुळे पाठदुखीची समस्या निर्माण होते. तसेतर पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. पण अलिकडेच ही समस्या तरुणांमध्ये देखाल वाडत चाललली आहे.
सारखे बैठे काम करणे, शारीरिक हालचाल न करणे, वाढते वजन यामुळे कंबरदुखीची समस्या वाढते. ही समस्या कमी करणे फार अवघड नाही. योग्य आहार आणि व्यायाम यामुळे तुम्ही ही समस्या कमी करू शकता.
वृद्धांमध्ये तर ही समस्या आहेच पण तरुणांमध्येदेखील ही समस्या वाढत असल्याचे दिसत आहे. खास करून लॅपटॉपवर सतत बसून काम करणाऱ्या, शारीरिक व्यायाम अधिक नसलेल्या तरुण वर्गामध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे. कंबरदुखीची नेमकी कारणे कोणती आणि तिच्यापासून दूर कसे राहता येईल हे जाणून घेऊया.
काय करावे काय करू नये
शरीराची उठण्या-बसण्याची पद्धत योग्य नसेल तर मणक्याच्या हाडाची संरचना बदलते आणि यामुळे कंबरेच्या खालच्या भागात, मानेमध्ये वेदना सुरू होतात.
कंबरदुखीपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास नेहमी कंबर सरळ आणि मागच्या बाजूला करून बसावे.
शरीराचा भार दोन्ही हिप्सवर बरोबर असला पाहिजे.
प्रत्येक 30 मिनिटांनंतर आपली बसण्याची स्थिती बदलली पाहिजे.
खुर्चीवर बसल्यानंतर दोन्ही पाय जमिनीवर सरळ करावेत.
उभे राहताना छातीबाहेर आणि पोट आतल्या बाजूला असावे.
कंबर सरळ आणि गुडघे वाकलेले नसावेत.
दीर्घकाळ एकाच स्थितीत उभे राहणे टाळावे.
आपली उभे राहण्याची आणि बसण्याची पद्धत योग्य असेल आणि शारीरिकदृष्ट्या आपण योग्य प्रकारे सक्रिय असू तर कंबरदुखीची समस्या नक्कीच दूर राखता येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.