Mahashivratri 2024: Mahashivratri 2024 Date, Time, Muhurt Details in Marathi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024 Date : यंदाची महाशिवरात्री शुक्रवारी की शनिवारी? जाणून घ्या अचूक वेळ अन् मुहुर्त

Mahashivratri 2024 Date, Time, Muhurt : यंदा महाशिवरात्री ८ मार्च की ९ मार्च, कधी साजरी केली जाणार आहे. जाणून घ्या योग्य दिवस कोणता आहे.

Puja Bonkile

Mahashivratri Date 2024 know about shubh muhurat shiv puja time vidhi

यंदा महाशिवरात्री हा पवित्र सण शुक्रवारी आहे की शनिवारी? यावेळी महाशिवरात्रीची तारीख दोन दिवसांनी कमी झाल्याने हा प्रश्न पडला आहे. आता महाशिवरात्री नेमकी कोणत्या दिवशी आणि तिथी याबाबत लोकांच्या मनात शंका आहे.

हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. पण यंदा महाशिवरात्रीची नेमकी तारीख, पूजेची शुभ वेळ कोणती आहे हे जाणून घेऊया.

महाशिवरात्री २०२४ कोणत्या दिवशी आहे?

यंदा महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी शुक्रवार, ८ मार्च रोजी रात्री ०९:५७ पासून सुरू होईल आणि शनिवार, ९ मार्च रोजी संध्याकाळी ०६:१७ वाजता समाप्त होणार आहे. उदयतिथीच्या आधारे पाहिल्यास, फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी शनिवार ९ मार्च मानली जाईल, परंतु त्या दिवशी महाशिवरात्री पूजेसाठी निशिता मुहूर्त उपलब्ध होणार नाही कारण फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी संध्याकाळीच संपत आहे.

महाशिवरात्रीची निशिता पूजा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला करावी. महाशिवरात्रीची निशिता पूजनाचा शुभ मुहूर्त ८ मार्च, फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला आहे. त्यामुळे शुक्रवारी महाशिवरात्री साजरी केली जाणार असून, त्याच दिवशी उपवास व पूजा करणे शुभ मानले जाते.

यंदा महाशिवरात्रीच्या पूजेचा निशिता मुहूर्त पहाटे १२.०७ ते १२.५६ पर्यंत आहे. तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी हा शुभ काळ महत्त्वाचा मानला जातो. पण सर्वसामान्यांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशीची पूजा सूर्योदयापासून सुरू होते. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ५:१ मिनिटापासून ब्रह्म मुहूर्त असतो.

महाशिवरात्री २०२४ चा उपवास कधी सोडायचा?

शनिवारी ९ मार्च रोजी महाशिवरात्रीचे व्रत सोडावे. ९ मार्च रोजी सूर्योदयानंतर महाशिवरात्रीचे व्रत सोडावे. त्या दिवशी सूर्योदय सकाळी ०६:३७ वाजता होईल.

महादेवाला कोणत्या गोष्टी अर्पण करावे

महादेवाला धोतऱ्याचे फुल अर्पण करावे.

बेलाचे पान आणि फळ महादेवाला प्रिय आहे.

भोलेनाथाला नेहमी पांढरे फुल अर्पण करावे.

महादेवाला चुकूनही तुळशीचे पान अर्पण करू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT