Mahashivratri 2024  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला करा 'हे' उपाय, दूर होतील विवाहातील अडथळे

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला भगवान शंकराची मनोभावे पुजा केल्यास विवाहातील अडथळे दूर होतील.

Puja Bonkile

Mahashivratri 2024 remedies for get marriage and get desired life partner

महाशिवरात्री हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या वेळी महाशिवरात्री शुक्रवार ८ मार्च रोजी साजरा होणार आहे. या दिवशी मनोभावे पुजा केल्याने समस्या दूर होते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वतावर माता पार्वतीशी विवाह केला होता.

महाशिवरात्री हा सण विवाहाशी संबंधित उपाय करण्यासाठी खूप चांगला मानला जातो. या दिवशी काही विशेष कार्य केल्याने इच्छित वराची मनोकामना पूर्ण होते आणि भोलेनाथांच्या कृपेने लवकर विवाह होण्याची शक्यता असते.

अक्षत अर्पण करणे

योग्य वर मिळण्यासाठी मुलींनी या दिवशी शिवलिंगाला मूठभर अखंड अक्षत अर्पण करावे. याशिवाय शिवलिंगावर दूध आणि दही अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि इच्छित जीवनसाथीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच माता पार्वतीला लाल रंगाचे कपडे, केशरी सिंदूर आणि मेकअपचे सामान अर्पण करावे. त्यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता वाढते.

मेहंदी लावावी

महाशिवरात्रीच्या दिवशी मुलींनी माता पार्वतीला मेहंदी लावावी आणि नंतर तीच मेहंदी हातावर लावावी. असे केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते आणि विवाहातील अडथळेही दूर होतात. माता पार्वतीला लावलेली मेहंदी प्रसाद म्हणून वाटल्यास शुभ फळ मिळते.

पांढरा रंग

भगवान शंकरांना पांढरा रंग खूप आवडतो. या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करून भगवान शंकराची पूजा केल्यास विवाहातील अडथळेही दूर होतात. त्यामुळे इच्छित वर मिळण्यास मदत होते.

बेलाचे पान आणि फळ

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वतीला बेलाचे पान आणि फळ अर्पण करून प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतींसोबत रुद्राक्षाचीही पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते.

जलाभिषेक

महाशिवरात्रीच्या दिवशी मुलींनी उपवास करून मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. या दिवशी गरीब गरजू मुलीला पिवळी साडी, बेसनाचे लाडू आणि तांदूळ दान केल्याने लवकर विवाह इच्छित वराशी लग्न होऊ शकते.

शुद्ध तुपाचा दिवा

या दिवशी लवकर आंघोळ करून भगवान शंकरासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिवा लावा आणि भगवान शिवाच्या "ओम नम: शिवाय" या मंत्राचा जप करा. या दिवशी शिव मंत्रांचा जप केल्याने वैवाहिक जीवनातील तणाव दूर होतो.

सोन्याची अंगठी

महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेनंतर मुलीने तिच्या पहिल्या तर्जनीमध्ये सोन्याच्या अंगठीत साडेसहा रत्ती पिवळा पुष्कराज घालावा. त्यामुळे लग्न वेळेवर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

Cricketer Banned: टी-20 स्पर्धेदरम्यान कोकेनचे सेवन, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डोप टेस्टमध्ये फसला; क्रिकेट खेळणाऱ्यावर बंदी

Jharkhand Accident: झारखंडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकनं लोकांना चिरडलं; 3 महिला, 3 बालकांसह 7 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

SCROLL FOR NEXT