Mahashivratri 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला महादेवाची पूजा कशी करावी? जाणून घ्या या दिवशी काय करावे अन् काय नाही

Puja Bonkile

Mahashivratri 2024 how to worship lord shiva know what to do or avoid read full story

हिंदू धर्मानुसार महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीचा विवाह देखील आहे आणि या दिवशी महादेवाने तांडव नृत्य केले होते. या दिवशी महादेवाची उपासना केल्याने कुटुंबात आनंद आणि शांती तर मिळतेच, परंतु तुमच्या इच्छा देखील पुर्ण होऊ शकतात.

यंदा ८ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे. मात्र, वर्षातील 12 महिन्यांत 12 शिवरात्री येतात. याला मासिक शिवरात्री म्हणतात, पण फाल्गुन महिन्याची शिवरात्र म्हणजे महाशिवरात्री. वर्षभरात महादेवाची पूजा करण्याचा हा सर्वात शुभ दिवस आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे?

जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर एक दिवस आधी उपवास करण्याचा संकल्प करावा. महाशिवरात्रीच्या आधी सकाळी स्नान करावे आणि शिवपूजेच्या वेळी उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. हा संकल्प हातात थोडे तांदूळ आणि पाणी घेऊन करावा.

  • महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरच उठावे. असे करणे शुभ मानले जाते.

  • उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. या दिवशी पांढरे वस्त्र घालणे अत्यंत शुभ असते.

  • महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात १०८ वेळा 'ओम नमः शिवाय' चा जप करावा.

  • सकाळी शिवलिंगावर दूध, धोतरा, पांढरी फुले, बेलपत्र, विभूत, दही, मध, तूप आणि साखर अर्पण करा.

  • महाशिवरात्रीची विशेष पूजा रात्री केली जाते. म्हणून संध्याकाळच्या पूजेला बसण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच उपवास सोडावा.

महाशिवरात्रीला या गोष्टी करू नका

तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत केले नसले तरी या दिवशी तांदूळ, गहू, डाळी असे कोणतेही पदार्थ खाऊ नका.

महाशिवरात्रीला मांसाहार करणे टाळावे. तसेच या दिवशी कांदा आणि लसूण खाऊ नका.

शिवलिंगावर नारळ अर्पण करू नका. त्याचे सेवनही करू नका.

महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे चुकूनही घालू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT