Mahashivratri 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला घरात लावा भोलनाथाचा फोटो, पैशासोबत जीवनात येईल सुख-समृद्धी

Mahashivratri 2024: देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. मंदिरांमध्ये सुंदर सजावट करण्यात आली आहे. भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवभक्त मनोभावे पूजा करतात. तुम्हालाही भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर वास्तुनुसार भोलेनाथाचा फोटो घरात लावू शकता.

Puja Bonkile

mahashivratri 2024 according to vastu tips shiva family photo fix in home

हिंदू धर्मात भगवान शिवाला विशेष मान्यता आहे. भगवान शिवांना महादेव, भोलेनाथ अशा अनेक नावांनी संबोधले जाते. शिवभक्त महाशिवरात्री हा सण एका खास पद्धतीने साजरा करतात. 

या दिवशी महादेवाची विधीपूर्वक आणि मनोभावे पूजा केली जाते. यंदा 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. अनेक मदिरांमध्ये सुंदर सजावट करण्यात आली असून किर्तन आयोजित करण्यात आले आहे.

भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच लोक त्यांच्याशी संबंधित उपाय देखील करतात. शास्त्रानुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला. अशा स्थितीत वास्तूनुसार पूजा करण्यापासून ते या दिवशी भगवान शिव परिवाराचा फोटो लावण्यापर्यंत भगवंताचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. 

वास्तुशास्त्रानुसार भगवान शिवाचा फोटो घरात लावल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात, परंतु भगवान शिव परिवाराचे फोटो चुकीच्या दिशेने लावल्याने त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. 

यामुळे महादेव क्रोधित होतात, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या नशिबावर आणि आयुष्यावर होतो. चला जाणून घेऊया घरात भगवान शिव परिवाराचा फोटो लावण्याचे नियम कोणते आहेत.

योग्य दिशा

वास्तुशास्त्रामुसार शिव परिवाराचे फोटो नेहमी उत्तर दिशेला किंवा पूर्व आणि उत्तरेला कोनात ठेवता येते. उत्तर दिशेला असलेल्या कैलास येथे भगवान शिव वास करतात अशी यामागची धारणा आहे. 

उत्तर दिशेचा अधिपती कुबेर आहे. तो भगवान शिवाच्या महान भक्तांपैकी एक आहे. या दिशेला शिव परिवाराचे फोटो लावल्याने व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते. घरात राहणाऱ्या सर्व लोकांना रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते. पूजेच्या घरी शिव परिवाराचा फोटो लावा. तुमचे कुटुंब ज्या हॉलमध्ये आहे तेथे तुम्ही ते लावू शकता.

मूर्ती रागीट स्वरूपाची नसावी

भगवान शिव कुटुंबाची तीच मूर्ती लावावी, ज्यामध्ये भगवान शिव, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय बसलेले आहेत. असा फोटो लावल्याने घरात आनंद आणि सकारात्मकता येते. आपल्या घरात किंवा पूजास्थानात भगवान शिव किंवा माता पार्वतीच्या उग्र रूपाची मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नका. हे प्रचंड उर्जेचे प्रतीक आहे, जे एखाद्या व्यक्तीचे मन अस्वस्थ करते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी घरात देवाच्या शांत आणि सौम्य प्रतिमेचेच फोटो किंवा मूर्ती ठेवावी. 

या गोष्टी ठेवाव्या लक्षात

तुम्ही ज्या ठिकाणी भगवान शंकराचे फोटो लावले आहे, त्या ठिकाणी प्रकाश यायला हवा. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. शिव परिवाराचा फोटो अनियमित आकाराचा नसावा हे लक्षात ठेवा. तसेच घरात कोणत्याही ठिकाणी शिव परिवाराचे फोटो लावावे. पण तेथे बाथरूम नसावे किंवा बाथरूमचे दार त्या दिशेने उघडे नसावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

Cricketer Banned: टी-20 स्पर्धेदरम्यान कोकेनचे सेवन, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डोप टेस्टमध्ये फसला; क्रिकेट खेळणाऱ्यावर बंदी

Jharkhand Accident: झारखंडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकनं लोकांना चिरडलं; 3 महिला, 3 बालकांसह 7 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

SCROLL FOR NEXT