Madhya Pradesh: अद्भुत दृश्ये पाहण्यासाठी या '5' ठिकाणांना एकदा नक्की भेट दया Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Madhya Pradesh: अद्भुत दृश्ये पाहण्यासाठी या '5' ठिकाणांना एकदा नक्की भेट दया

मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला ऐतिहासिक (Historical Place) ठिकाण आणि निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळते.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) हे अतिशय सुंदर राज्य आहे. येथे तुम्हाला ऐतिहासिक (Historical Place) ठिकाण आणि निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळते. यामुळे हे राज्य पर्यटनासाठी (Tourism) प्रसिद्ध आहे. उज्जैन, ग्वालियर यासारखी अनेक प्रसिद्ध, सुंदर ठिकाणे (Places) पाहण्यासारखी आहेत. यामुळेच जगभरातील पर्यटक (Tourists) येथील ठिकाणांना भेट द्यायला येतात. चला तर मग जाणून घेवूया मध्य प्रदेशीलमधील प्रसिद्ध, ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणांनाबद्दल.

* उज्जैन

उज्जैन मध्य प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. मध्य प्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून फक्त 55 किमी अंतरावर आहे. पवित्र क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराला 'मंदिराचे शहर' असे देखील म्हणटल्या जाते. कारण येथील प्रत्येक रस्त्यावर मंदिरे दिसतात. या शहराचे वैशिष्टे म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. या शहरात दार 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. त्यासाठी जगभरातून करोडो लोक येतात. प्रसिद्ध कवी कालिदास यांनी म्हटले आहे की, "पृथ्वीला स्वर्ग बनवण्यासाठी हे शहर खाली आले आहे' यावरून हे शहर कीती सुंदर आहे याचा अंदाज येतो.

Ujjain

* ग्वालियर

हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथील किल्ले, स्मारके, सुंदर राजवाडे आणि मंदिर पाहेणीसारखे आहेत. ग्वालियर किल्ला, जय विलास महाल आणि सूर्य मंदिर हे येथील प्रमुख पर्यंटन स्थळे आहेत. आज ग्वालियर शहर एक प्रसिद्ध औद्योगिक केंद्र बनले आहे. या शहराला गालव ऋषिची तपोभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. चारही बाजूनी सुंदर डोंगर आणि हिरवळने वेढलेले हे शहर पाहण्यासाठी देशातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. यामुळे ग्वालियर या शहराला नक्की भेट द्या.

Gwalior

* पंचमढी

पंचमढी हे ठिकाण मध्य प्रदेशमधील होशंगाबाद जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणाला 'सातपुराची राणी' म्हणूनदेखील ओळखले जाते. येथे घनदाट जंगल, पर्वतांच्या उंचीवरुन पडणारे धबधबे आणि तलाव या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. येथील 'सिल्व्हर फॉल' पाहण्यासारखा आहे. यामुळे तुम्ही जर कधी मध्य प्रदेशला गेलात तर या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका.

Pachmarhi

* भीमबेटका  

भीमबेटका हे एक पुरातन ठिकाण आणि जागतिक वारसा असेलले स्थान आहे. हे ठिकाण भारताच्या राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे. भोपाळपासून 45 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. येथे हजारो वर्षापूर्वीची 500 हुन अधिक रॉक शेल्टर आणि लेण्या पाहायला मिळतील. येथील सर्वात जुनी चित्रकारी 12 हजार वर्षे जुनी मानली जाते. येथे आपल्यावर तुम्हाला एका अद्भुत जगात आल्यासारखे वाटेल. मध्य प्रदेशमध्ये आल्यास या ठिकाणाला अवश्य भेट द्या.

Bhimbetka rock shelters

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT