Low Blood Sugar Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Low Blood Sugar: शुगर लेवल कमी असल्यास शरीरात दिसतात 'हे' लक्षणं

शरीरात

Puja Bonkile

low blood sugar health effects know what happens when blood sugar goes low

ब्लड शुगर लेवल वाढल्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्या लोकांची शुगर लेवल अनेकदा वाढलेली असते त्यांना मधुमेह, मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

म्हणूनच सर्व लोकांना लाइफस्टाइल आणि आहार सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की रक्तातील साखर वाढवण्याप्रमाणेच ती कमी होणे देखील शरीरासाठी अनेक प्रकारे समस्या निर्माण करू शकते.

शुगर लेवल कमी का होते?

दिवसभरात रक्तातील साखरेची पातळी वारंवार बदलते. ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना रक्तातील साखर कमी होण्याचा धोका असू शकतो. याशिवाय रोजच्या काही चुकीच्या सवयींमुळे लो ब्लड शुगरची समस्या होण्याचा धोका असतो.

जास्त प्रमाणात इन्सुलिन घेणे, इन्सुलिननुसार पुरेसे कर्बोदके न घेणे, दारू पिणे आणि हवामानातील बदल यामुळे देखील साखरेची पातळी सामान्यपेक्षा कमी होऊ शकते. जर तुमची साखरेची पातळी वारंवार कमी राहिली तर त्याच्या धोक्यांबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

वाईट परिणाम कोणते?

शुगर लेवल कमी झाल्यास आपल्याला त्याची लक्षणे दिसतीलच असे नाही. जर रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ कमी राहिली तर ते अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकते. शुगर लो झाल्यामुळे हृदयाचे ठोके जलद होणे, घाम येणे, अस्वस्थता, चिडचिड, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ब्लड शुगर कमी म्हणजे 54 mg/dL पेक्षा कमी असल्यानेही कोमामध्ये जाऊ शकतो.

ब्लड शुगर लेवल किती असावी

आरोग्य तज्ञाच्या मते, जेवणाआधी ग्लुकोजची पातळी 70 mg/dL ते 100 mg/dL सामान्य मानली जाते. जर जेवणाआधीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण 100 ते 125 mg/dL असेल आणि जेवणानंतर त्याची पातळी 140 mg/dL पेक्षा जास्त राहिली तर ती हाय शुगर मानली जाते. तर 80 mg/dL किंवा त्याहून कमी पातळी कमी ग्लुकोजचे लक्षण आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा धोका असू शकतो

शुगर कमी असल्यास काय करावे?

डॉक्टरच्या मते, जर तुम्हाला अनेकदा कमी रक्तातील साखरेची समस्या असेल, तर तुमच्या आहारात आणि दैनंदिन दिनचर्येत विशेष सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या आहारात निरोगी कार्बोहायड्रेट पदार्थांचा समावेश करावा. शुगर कमी झाल्यास ताबडतोब थोड्या प्रमाणात गोड पदार्थ, बिस्किट किंवा मध खावे आणि शुगर लेवल चेक करावी.

जे लोक इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात त्यांनी तज्ञांच्या सल्ल्याशिवाय शुगर कमी करणारे उपाय टाळावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT