Liver Detox Drink:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Liver Detox Drink: लिव्हरमधील घाण झटक्यात साफ करेल 'हे' डिटॉक्स ड्रिंक

लिव्हरमधील साचलेली घाण साफ करायची असेल तर तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

Liver Detox Drink: थंडीच्या मोसमात अनेकदा त्वचा आणि पोटाशी संबंधित गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.  थंडीच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत थोडासा बदल होतो, ज्यामुळे लोक बाह्र जाणे टाळतात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन पोटाशी संबंधित अनेक गंभीर आजार उद्भवू लागतात. 

त्याचा परिणाम लिव्हरदेखील होतो. अशा परिस्थितीत पोट आणि यकृत संबंधित आजारांपासून दूर राहायचे असेल, तर लिव्हरचे वेळोवेळी डिटॉक्सिफिकेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लिव्हरमध्ये साचलेली घाण साफ होते आणि तेथेच स्वच्छ होते. हे डिटॉक्स वॉटर कोणते आहे आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊया.

सफरचंद आणि सब्जा बियापासून बनवलेल्या डिटॉक्स वॉटर पिणे फायदेशीर असते. हे डिटॉक्स वॉटर प्यायल्याने पोट तर साफ होईलच पण लिव्हरमध्ये साचलेली घाणही निघून जाईल. जर तुम्ही देखील या गंभीर समस्येचा सामना करत असाल तर तुम्ही या पाण्याचा आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमची समस्या लवकरच दूर होईल. च

डिटॉक्स वॉटरचे फायदे

  • हे हेल्दी डिटॉक्स वॉटर वेळोवेळी प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.

  • याशिवाय डिटॉक्स वॉटर प्यायल्याने लघवीशी संबंधित समस्या कमी होतात आणि शरीरात साचलेली सर्व घाण निघून जाते.

  • तसेच डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याने पोटातील सर्व घाण निघून जाते आणि पोट पूर्णपणे स्वच्छ होते.

  • इतकेच नाही तर डिटॉक्स वॉटर प्यायल्याने त्वचा आणि केसांना चमक येते आणि त्वचा चमकदार होते.

डिटॉक्स वॉटर कसे बनवावे

साहित्य

  • 1 लिटर पाणी

  • 1 हिरवे सफरचंद

  • सब्जा बीया

  • पुदीना पाने

  • तुळशीची पाने

हे बनवण्यासाठी तुम्हाला पाणी घ्यावे लागेल. 5 तुळशीची पाने आणि 10 पुदिन्याची पाने धुवून या पाण्यात टाका. यानंतर सफरचंदाचे छोटे तुकडे करून पाण्यात टाका. यानंतर, त्यात 1 चमचा सब्जा बीया मिसळा आणि सर्वकाही एकत्र करा. नंतर हे पाणी 1 तास ठेवा, त्यानंतर तुम्ही ते पिऊ शकता.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT