Lip Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lip Care: गुलाबी ओठांसाठी 'ही' काळजी जरुर घ्या

Lip Care: याशिवाय ओठांचा काळपटपणादेखील नाहीसा होतो.

दैनिक गोमन्तक

Lip Care: आपल्या जेव्हा निरोगी असतो तेव्हा आपण अधिक सुंदर दिसतो. शरिरातील रक्ताभिसरण जर व्यवस्थित होत असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरिरावर, त्वचेवर आणि दिसण्यावर होतो. तुमच्या ओठांवरदेखील त्याचा परिणाम होतो.

कधी काळी चांगले दिसणारे ओठ अचानक काळपट दिसायला लागतात. चला तर जाणून घेऊयात कशामुळे हा बदल जाणवतो आणि असे होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी.

ओठ खराब कशामुळे दिसतात

1. दुखापतीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होणे

2. जीवनसत्वाची कमतरता

3. रक्तातील साखरेची कमी पातळी

4. मोठ्या प्रमाणात औषधे

5. गर्भधारणा

अशाप्रकारे ओठांची काळजी घेतली जाऊ शकते

1. हायड्रेटेड राहा

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे ओठांमध्ये कोरडेपणा येणार नाही आणि ते तडे जाणार नाहीत. याशिवाय ओठांचा काळपटपणादेखील नाहीसा होतो.

2. कोरफड आणि मध वापरा

तुमच्या घरातील एका भांड्यात कोरफडीचा गर काढा. यामध्ये मध मिसळा आणि ओठांवर लावा. आता 15 मिनिटे राहू द्या आणि शेवटी स्वच्छ पाण्याने ओठ धुवा. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतात.

3. बीटरूटचा रस

सर्वप्रथम बीटरूट सोलून त्याचा रस काढा. आपल्या बोटांच्या मदतीने ते ओठांवर लावा आणि 15 मिनिटे तसेच ठेवा नंतर ते स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे करु शकता. बीटरूटमध्ये असणारा नैसर्गिक रंग तुमच्या ओठांना मऊ आणि गुलाबी बनवण्यास मदत करतो.

4. तुमचे ओठ नेहमी एक्सफोलिएट करा

तुम्हाला फक्त रुमाल किंवा टूथब्रश ओला करायचा आहे आणि तुमचे ओठ हलक्या हाताने घासायचे आहेत. हे मृत त्वचा आणि ओठांचा कोरडी त्वचा काढून टाकते आणि रक्ताभिसरण देखील सुधारते. तुमचे ओठ मऊ होण्यासाठी नेहमी रात्री खोबरेल तेल लावा

5. लिपस्टिक वापरताना काळजी घ्या

आपण अनेक प्रकारच्या लिपस्टिक वापरत असतो. लिपस्टिक वापरताना ते आपल्या ओठांसाठी हानीकारक नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी लिपस्टिक काढणेदेखील गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT