Food Storage Mistakes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: फ्रीजमध्ये पदार्थ स्टोअर करताना 'ही' चूक करू नका, अन्यथा...

फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही तुमचे पदार्थ खराब होत असेल तर त्यामागचे कारण काय आहे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Kitchen Hacks: जवळपास प्रत्येक घरात फ्रिज आहे. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ फ्रेश राहतात. पण अनेक वेळा फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खराब होतात. प्रत्येकवेळी फ्रिज खराब झाला म्हणून असे होत नाही तर काही छोट्या चुकांमुळे देखील असे होऊ शकते. या चुका कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

फळं-भाज्या

फळं आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी धुऊन ठेवतो. पण असे केल्याने ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस तयार होते. यामुळे मार्केटमधुन आणलेले फळं आणि भाज्या न धुता पॅकेटमध्ये ठेवाव्या. वापरण्यापुर्वी भाज्या धुवाव्यात.

पदार्थ उघडे ठेवणे

जर तुम्ही फ्रिजमध्ये पदार्थ उघडे ठेवले तर ते लवकर खराब होऊ शकतात. म्हणून, पदार्थ नेहमी चांगले झाकून ठेवावे किंवा हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे पदार्थ खराब होणार नाही.

अंडी फ्रीजमध्ये चुकीच्या ठिकाणी ठेवणे

फ्रिजमध्ये ठेऊनही अंडी खराब होत असतील तर ती चुकीच्या जागी ठेवल्यामुळे असू शकते. फ्रिजमध्ये अंडी ठेवण्यासाठी खास जागा दिलेली असते. पण तरीही त्याचा वापर करू नये. अंडी नेहमी फ्रिजच्या खालच्या शेल्फवर मागील बाजूस ठेवावीत. कारण फ्रेश राहण्यासाठी 40 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्याहून कमी तापमानाची गरज असते.

फ्रीजमध्ये चुकीच्या ठिकाणी सामान ठेवणे

बहुतेक लोकांना हे माहित नसते की फ्रीजमध्ये प्रत्येक वस्तूसाठी एक निश्चित जागा असते. अशावेळी वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवणे ही एक सामान्य चूक आहे, ज्यामुळे पदार्थ खराब होऊ शकतात. लक्षात ठेवा की कच्चे मांस किंवा मासे नेहमी फ्रिजच्या खालच्या शेल्फवर ठेवावेत. त्याच ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ देखील ठेऊ शकता. तसेच रेडी टू इट खाद्यपदार्थ फ्रिजच्या वरच्या शेल्फवर ठेवावेत.

उरलेले पदार्थ जास्त काळ स्टोअर करणे

उरलेले पदार्थ कधीही फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवू नका. कारण 3-4 दिवसांनी त्यात बॅक्टेरिया आणि फंगस वाढु शकतात. असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT