हिवाळ्यात नक्की ट्राय करा पनीर ब्रेड पकोडा , पहा रेसिपी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Food: ट्राय करा पनीर ब्रेड पकोडा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला 'पनीर ब्रेड पकोडा' ची रेसिपी सांगणार आहोत.

दैनिक गोमन्तक

तुम्ही जर ब्रेड (Bread) घवून थकला असला तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी एक स्वादिष्ट पदार्थ घेवून आलो आहोत. तुम्ही अनेक वेळा शाळेत ब्रेड (Bread Pakoda)पाकोड नेला असेल किंवा डब्बा पार्टीमध्ये (Party) हा पदार्थ नेला असेल. अशा अनेक जुन्या आठवणी असतील. पण आज आम्ही तुम्हाला 'पनीर ब्रेड पाकोड्याची' रेसिपी (Recipe) सांगणार आहोत.

पनीर ब्रेड पकोड्यामध्ये (Paneer Bread Pakoda)व्हेज फिलिंग असते. ज्यामध्ये मसाल्याचे मिश्रण असते. या रेसिपीमध्ये बाटाट्याचा वापर केलेला नाही पण तुम्ही यात पनीर भरण्यासाठी मॅश केलेल बटाटे घालू शकता. याला कमी तेलात(Oil) फ्राय करू शकता. तुम्ही हा पदार्थ पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत आस्वाद घेवू शकता. तसेच तुम्ही हिवाळ्यात गरमा गरम चहा किंवा कॉफीसोबत सुद्धा पनीर ब्रेड पाकोड्यांचा आस्वाद घेवू शकता.

* साहित्य:

  • एक कप किसलेला पनीर

  • 1/4 कप उकलेले मटार

  • 1/2 हळद

  • 1/2 हिंग

  • 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

  • 1/2 काळी मिरी

  • 1/4 कप किसलेले गाजर

  • 1 छोटा चमचा लाल तिखट

  • 1 ते 1/2 कप बेसन

  • 8 ब्राऊन ब्रेड

  • चवीनुसार मीठ

  • 1 कप तेल

एक बाउलमध्ये पनीर, मटार, गाजर, धणे, लाल मिरची, हळद आणि मीठ मिक्स करावे. सर्व चांगले मिक्स करावे. नंतर ब्रेड स्लाइस घेवून त्यात हे मिश्रण भरावे. नंतर त्यावर ब्रेड स्लाइस ठेवावे. आता स्टफिंगसह ब्रेडचे तुकडे दोन समान भागांमध्ये कापून घ्या. नंतर एक भांड्यात बेसन, 1 कप पाणी, 1/4 हळद, 1/2 तिखट, मीठ आणि हिंग टाकावे. हे मिश्रण हाताने चांगले मिक्स करावे. आता यात ब्रेडचे तुकडे बुडवा. नंतर एका कढईमध्ये तेल (Oil) गरम करायला ठेवा. यात हळूहळू ब्रेडचे (Bread) तुकडे तपकिरी होईपर्यंत तळावे. तयार आहे तुमचे पनीर ब्रेड पकोडा. पनीर ब्रेड पकोडे सर्व्हिंग प्लेटमध्ये पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत (Tomato sauce) आस्वाद घेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT