Laptop- Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Laptop Care: 'या' घरगुती उपायांचा वापर करून स्वच्छ करा लॅपटॉप

Laptop Care Tips: अनेकदा लोक लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जातात. पण तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून घरीच लॅपटॉप स्वच्छ करू शकता.

Puja Bonkile

Laptop Care Tips: लॅपटॉप हा आपल्या रोजच्या कामाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफिसचे काम असो किंवा घरातील मनोरंजन असो, लॅपटॉपशिवाय काम पूर्ण करू शकत नाही.

जवळपास सर्वच लोक लॅपटॉपचा वापर करतात. त्यामुळे लॅपटॉपवर विविध प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि घाण साचतात. ज्यामुळे लॅपटॉप फक्त खराब दिसत नाही तर त्याचे आयुष्यही कमी होते. 

लॅपटॉप स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. अनेकदा लोक लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जातात. पण तुम्ही काही सोप्या पद्धतींनी तो स्वच्छ ठेऊन त्याचे आयुष्य वाढवू शकता.

कोणत्याही त्रासाशिवाय आपण लॅपटॉप घरी कसा स्वच्छ करू शकतो? लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

  • लॅपटॉपची स्क्रीन

लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी मऊ कापड किंवा मायक्रोफायबर कापड वापरावे.

कपड्यावर काही डिस्टिल्ड वॉटर किंवा स्पेशल स्क्रीन क्लीनर टाकावे. ते थेट स्क्रीनवर टाकणे टाळा.

स्क्रीनवर हळूवारपणे पुसावे. लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाणी थेट टाकू नये.  

  • लॅपटॉपचे कीबोर्ड

लॅपटॉपचे कीबोर्ड स्वच्छ करतांना सर्वात पहिले लॅपटॉप बंद करावे.

कीबोर्डच्या बटणांमधील धूळ स्वच्छ करावी.

कीबोर्ड की स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल आणि पाण्याचे समान मिश्रण तयार करा आणि त्यात कापूस बुडवावे नंतप पुसुन काढावे.  

  • लॅपटॉपचे टचपॅड आणि बाहेरील भाग

लॅपटॉपचे टचपॅड आणि बाहेरील भाग स्वच्छ करण्यासाठी एक मऊ कापड घ्यावा आणि त्यात थोडे डिस्टिल्ड वॉटर किंवा अल्कोहोलचे मिश्रण मिक्स करावे. हळूवारपणे टचपॅड आणि बाहेरील भाग स्वच्छ करावे. 

  • जाणून घ्या काय खबरदारी घ्यावी

लॅपटॉप स्वच्छ करण्यापूर्वी, तो बंद आहे आणि सॉकेटपासून डिस्कनेक्ट झाला आहे याची खात्री करावी.

लॅपटॉपवर थेट पाणी टाकू नका.

कधीही जास्त दबाव देऊन घासण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे लॅपटॉप खराब होऊ शकतो. 

तुम्ही या पद्धती फॉलो केल्यास तुमचा लॅपटॉप पूर्णपणे स्वच्छ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT