Exhaust Fan: घरातील एक्झॉस्ट फॅनच्या आवाजाने त्रस्त आहात? लगेच करा 'हे' 5 उपाय

घरातील एक्झॉस्ट फॅन गरम हवा बाहेर फेकून घर थंड ठेवण्याचे काम करते.
Exhaust Fan
Exhaust FanDainik Gomantak

Exhaust Fan: घरातील एक्झॉस्ट फॅन गरम हवा बाहेर फीकून घर थंड ठेवण्याचे काम करते. अनेक घरांमध्ये हा फॅन लावला जातो. विशेषतः स्वयंपाकघरात लावल्याने तेलकट धुर बाहेर जाण्यास मदत होते. पण अनेक वेळा एक्झॉस्ट फॅनमधुन खराब आणि मोठ्याने आवाज येऊ लागतो. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर काही उपाय केल्यास आाज कमी होऊ शकतो.

  • स्वच्छ करा

एक्झॉस्ट फॅनचे ब्लेड आणि मोटरवर धूळ साचल्याने घर्षण होऊ शकते, ज्यामुळे कर्कश आवाज वाढू शकतो. एक्झॉस्ट फॅन नियमितपणे स्वच्छ केल्यास तो योग्यरित्या काम करतो आणि आवाज कमी होतो.

  • दुरुस्त करा

एक्झॉस्ट फॅनचे ब्लेड किंवा मोटर खराब झाल्यास, त्यातुन कर्कश आवाज येऊ शकतो. एक्झॉस्ट फॅन दुरुस्त केल्यास आवाज कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला आवाजाचा त्रास देखील होणार नाही.

  • कमी स्पीडवर चालवा

एक्झॉस्ट फॅन वेगाने चालवल्याने आवाज जास्त वाढू शकतो. तुमच्या एक्झॉस्ट फॅनची स्पीड कमी असल्यास आवाज कमी होण्यास मदत होऊ शकते.

Exhaust Fan
Vastu Tips For Gift: लोकांना चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं
  • वॉटरप्रूफ मटेरियल लावा

एक्झॉस्ट फॅनच्या बाजुला वॉटरप्रूफ मटेरियल लावल्याने त्याचा येणार कर्कश आवाज कमी होण्यास मदत होते. तुम्ही वॉलपेपर, फ्लोअर रग किंवा इतर प्रकारचे वॉटरप्रूफ मटेरियल वापरू शकता. यामुळे एक्झॉस्ट फॅनचा येणारा आवाज कमी होतो.

  • नवीन एक्झॉस्ट फॅन लावा

जर तुमच्या एक्झॉस्ट फॅनमधून जास्त आवाज येत असेल तर घरात नवीन एक्झॉस्ट फॅन लावावा. एक हा एक चांगला पर्याय असू शकतो. नवीन एक्झॉस्ट फॅन्समध्ये दमदार मोटर असते, ज्यामुळे कमी आवाज येतो. तुम्हाला त्याच्या आवाजाचा त्रास होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com