Krishna Janmashtami 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Krishna Janmashtami 2023: जन्माष्टमीला 'या' चुका करणे टाळा, अन्यथा...

श्रीकृष्णाला नाराज करायचे नसेल तर जन्माष्टमीला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे

Puja Bonkile

Krishna Janmashtami 2023: भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी देशभरातील लोक मनोभावे कृष्णाची पुजा करतात. यावेळी 6 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. परंतु श्रीकृष्णाची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला जाणून घेऊया जन्माष्टमीला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे.

  • पंचामृताने अभिषेक करावा

जन्माष्टमीला श्रीकृष्णाला पंचामृताने अभिषेक करावा. पंचामृताने अभिषेक करताना दूध, दही, तूप, मध आणि साखर या गोष्टींचा वापर करावा. श्रीकृष्णाच्या अभिषेकासाठी गाईचे तूप वापरणे शुभ मानले जाते.

  • स्वच्छ कपडे घालावे

जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. यानंतर घरातील मंदिर स्वच्छ करावे. सुंदर फुलांनी मंदिर सजवावे.

  • सुंदर फुलांचा सजावट करावी

भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला अन्न अर्पण करताना त्यात तुळशीची पाने टाकावीत.

  • पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे

कृष्णाचे दुसरे नाव पितांबरी आहे. म्हणून या दिवशी त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करावे. आणि फुलांनी सजवावे. तसेच, त्याच्या डोक्यावर मोरपिस असलेले मुकुट घालावे.

  • घरात बनवलेला प्रसाद

जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी फक्त घरी बनवलेला प्रसादच अर्पण करावा. मार्केटमधली मिठाई प्रसाद म्हणून अर्पण करू नका.

  • श्रीकृष्णाचा जप करावा

जन्माष्टमीला पुजा करताना हरे कृष्ण मंत्राचा जप करावा. यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

Triton Cameras: आता गोव्यातल्या किनाऱ्यांवर लक्ष ठेवणार ‘ट्रिटन’ कॅमेरे! ‘दृष्टी’चा पुढाकार; बुडणाऱ्यांना त्वरित वाचवणे शक्य

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

SCROLL FOR NEXT