Meditation  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Meditation संबंधित हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का?

मानसिक आरोग्यासाठी ध्यान हा योग्य आणि उत्तम मार्ग सांगितला जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

मानसिक आरोग्याच्या संबधित अनेक समस्यांचा सामना जगातील अनेक लोक करत आहेत. मानसिक आरोग्यासाठी ध्यान हा योग्य आणि उत्तम मार्ग सांगितला जातो. ध्यान आपल्याला मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही सदृढ ठेवण्याचे काम करते. असे असले तरी प्रत्येक बाबतीत काही गैरसमज प्रचलित असतात. ध्यानाच्या बाबतीत देखील अनेच अनेक गैरसमज आहेत.

1) ध्यान करताना एका जागी डोळे मिटून जास्त वेळ बसण्याची गरज नाही, असे मानले जाते. दात घासणे, न्याहारी करणे किंवा गाडी चालवणे हे देखील एकप्रकारचे ध्यान आहे. असा एक गैरसमज आहे.

2) योग म्हणजे ध्यान नाही, योग करताना शरीरात वेगवेगळ्या आसनांमुळे हालचाल होते, तर ध्यानात असे होत नाही. ध्यान केल्याने, लोक त्यांच्या उर्जेद्वारे एखाद्या विशिष्ट गोष्टीवर, आवाजावर किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करतात. तुम्ही उभे राहून, बसून किंवा झोपूनही ध्यान करू शकता.

3) ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि लोकांमध्ये एक गैरसमज आहे की कोणती पद्धत चांगली आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे ध्यान करा, तुम्ही किती लक्ष केंद्रित करू शकता यावर चांगले परिणाम अवलंबून असतात.

4) ध्यान संबधित एक समज आहे की ते ग्रुपमध्ये करता येत नाही. ध्यान नेहमीच खाजगीत केले पाहिजे, पण असा विचार करणे चुकीचे आहे.

5) ध्यान करण्यासाठी कोणतेही विशेष तंत्र नाही, ही देखील लोकांमध्ये पसरलेली एक धारणा आहे. असे म्हटले जाते की आपण ते कोणत्याही प्रकारे करू शकता. जर तुम्हाला याला रुटीनचा भाग बनवायचा असेल, पण आळशीपणा तुम्हाला रोखत असेल, तर तुमचा कम्फर्ट झोन शोधा. शांतपणे ध्यान केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

Mohammed Shami Test Cricket Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'माझं एकच स्वप्न होतं...'

Goa Politics: निवडणुकीला 3 महिने बाकी, भाजपचा मोठा निर्णय; संकल्प आमोणकर घेणार मंत्रिपदाची शपथ

Horoscope: शनिवारचे राशिभविष्य! मेष, मिथुनसह 4 राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; नोकरीपासून व्यवसायापर्यंत होणार मोठा आर्थिक फायदा

Five Ideological Lamps of Diwali: दिवाळीत पणत्या लावता, पण मनात हे 5 दिवे प्रज्वलित केलेत का? सकारात्मक आणि आनंदी आयुष्यासाठी खास संदेश!

SCROLL FOR NEXT