Kitchen Tips : Reason of  pressure cooker explode
Kitchen Tips : Reason of pressure cooker explode  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

का होतो प्रेशर कुकरचा स्फोट; जणून घ्या करणे

दैनिक गोमन्तक

स्वयंपाकघरात (Kitchen) घडणाऱ्या सर्वात भयानक गोष्टींपैकी एक म्हणजे आपल्या प्रेशर कुकरचा (pressure cooker) स्फोट (explode) होणे. आणि हे अत्यंत धोकादायक आहे, यामुळे अपले प्रेशर कुकर खराब होऊ शकतो. तुम्हाला जर आशा आहे की प्रेशर कुकरच्या स्फोटाला सामोरे जायचे नसेल तर या टिप्स चा तुम्हाला उपयोग होऊ शकतो आणि तुम्ही ते टाळू शकता.

स्टोव्हटॉप व इलेक्ट्रिक

बऱ्याच लोकांना स्टोव्हटॉप आणि इलेक्ट्रिक प्रेशर कुकरमधील फरक कळत नाही आणि नेमकं काय सुरक्षित आहे यामध्ये संभ्रम आहे; दोन्ही प्रकारच्या कुकरमध्ये स्फोट होऊ शकतात परंतु स्टोव्हटॉप कुकरमध्ये ते अधिक वाईट असू शकतात कारण ते बहुतेकदा यामध्ये इलेक्ट्रिक कुकरपेक्षा जास्त दाब तयार होत असतो. तुम्ही यामध्ये जर नवखे असल्यास, इलेक्ट्रिक प्रेशर कुकरने वापरा कारण हे वापरण्यास सुरक्षित असतात आणि या कडे लक्ष कमी दिले तरी चालते.

प्रेशर कुकरचे स्फोट कशामुळे होतात

प्रेशर कुकरचा स्फोट टाळण्यासाठी, आधी आपल्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे माहित असणे आवश्यक आहे; याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत सदोष उपकरणे आणि सुचनांचे पालन न करणे. आपण स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी, आपण नेहमी आपल्या प्रेशर कुकरवर रबर गॅस्केट तपासावे जेणेकरून ते कोरडे नाही ना तसेच त्याला काही तडे नाहीत याची खात्री करा. एकदा तुमचे प्रेशर कुकरचे भाग चांगल्या स्थितीत असल्याची खात्री झाल्यावर, ते वापरात घ्या

स्फोट होण्यामागची काही प्रमुख कारणे

सूचनांकडे दुर्लक्ष करणे

जास्त पाणी घालणे

कुकर जास्त भरणे

चुकीच्या तापमानावर स्वयंपाक करणे

1. सूचनांकडे दुर्लक्ष करणे

आधी सांगीतल्याप्रमाणे तुम्ही सुचनांचे योग्य पालन न करता त्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या बाबतीत हा अपघात घडू शकतो; कुकर चा स्फोट होऊन जेवण तुमच्या सर्व भिंतींवर आणि छतावर पसरवण्याचा धोका असतो.

2. जास्त पाणी घालणे

प्रेशर कुकर मध्ये योग्य पाण्याचे प्रमाण ठेवा नहितेर हे आपघटचे प्रमुख कारण ठरू शकते

3. कुकर जास्त भरणे

जास्त पाणी घालण्यासारखेच, कुकरमध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पाणी घातल्याने जास्त दाब निर्माण होऊ शकतो ज्यामुळे स्फोट होतो; शिवाय अन्न देखील नीट शिजत नाही

4. चुकीच्या तापमानावर स्वयंपाक करणे

आपण इलेक्ट्रिकऐवजी स्टोव्हटॉप प्रेशर कुकर वापरत असल्यास हे अवघड असू शकते,कुकर जर खूप जास्त तापमानावर असेल तर कुकरमधील सामग्री खूप जास्त दबाव निर्माण करू शकते आणि स्फोट घडवून आणू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : भाजप सरकार धूळफेक करणारे : अमित पाटकर

Congress News : महिलांना देणार वर्षाला १ लाख! काँग्रेसचे आश्‍‍वासन

Bicholim News : चार वर्षानंतर मयेत होणार ‘रेड्या’ची जत्रा; भाविकांना दिलासा

Mapusa News : श्री देव बोडगेश्‍‍वर मंदिर पुन्हा लक्ष्य ; सिनेस्‍टाईल चोरी

Panaji News : श्रीपाद नाईक यांच्याकडून गोपाळ परब यांची विचारपूस

SCROLL FOR NEXT