Kitchen Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: लिंबू जास्त दिवस टिकवायचेत? वापरा ही सोपी ट्रिक

लिंबु जास्त दिवस फ्रेश ठेवायचे असेल तर असे स्टोअर करू शकता.

Puja Bonkile

Kitchen Hacks: लिंबू हा स्वयंपाकघरात वापरला जाणारा मूलभूत घटक आहे. लिंबु पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर त्याच्या अम्लीय स्वभावामुळे, लिंबाचा रस देखील साफसफाईसाठी खूप प्रभावी ठरतो. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढू शकते. अनेक लोक लिंबू मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. पण ते कसे स्टोअर करायचे याबाबत माहिती नसते. यामुळे लिंब खराब होतात आणि फेकून देतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला लिंबू फ्रेश कसे ठेवावयचे हे जाणून घेऊया.

तेलाचा वापर

जर तुम्ही एकाच वेळी भरपूर लिंबू विकत घेतले असतील तर त्यावर मोहरी किंवा रिफाइंड तेल लावले तर ते जास्त दिवस फ्रेश राहतात. नंतर झिप लॉक बॅगमध्ये ठेवावे आणि फ्रीजमध्ये किंवा सामान्य खोलीच्या तापमानात ठेवावे.

फ्रिजमध्ये ठेवावे

जर लिंबू फ्रेश ठवायचे असेल तर फ्रिजमध्ये ठेऊ शकता. यासाठी सर्वात पहिले लिंबू एका टिश्यूमध्ये ठेवावे. नंतर एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रिजरेटरमध्ये ठेवा. ही ट्रिक वापरून तुम्ही अनेक दिवस लिंबू फ्रेश ठेऊ शकता.

अॅल्युमिनियम फॉइल

लिंबू जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर त्याला अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळणे हा एक उत्तम पर्याय आहे. असे केल्याने लिंबू आर्द्रतेच्या संपर्कात येत नाही आणि जास्त काळ ताजे राहतात.

कसे स्टोअर कराल?

जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर लिंबू जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी एका भांड्यात पाणी, मीठ आणि मध यांचे मिश्रण तयार करावे आणि लिंबाचे मोठे तुकडे करून त्यात ठेवावे. नंतर 10-12 तासांनंतर हे मिश्रण वेगळे करावे. नंतर लिंबू सामान्य खोलीच्या तापमानात ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT