Kitchen Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: पिठात भुंगे असल्यास करा 'हे' घरगुती उपाय

तुमच्याही गव्हाच्या पीठात भुंगे लागले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

Kitchen Hacks: गव्हाच्या पिठाचा वापर जवळपास प्रत्येक घरात चपाती बनवण्यासाठी केला जातो.पण त्यात भुंगे झाल्यास ते स्वच्छ करणे अवघड जाते. कारण असे पीठ खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. म्हणून, प्रत्येक वेळी स्वयंपाक करताना, पीठ गाळूनच वापरावे. यामुळे तुमचा वेळ वाया जाईल.पण असे केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल

गाळून घ्यावे

पिठाच्या डब्यात किडे दिसल्यास सर्वात पहिले एका मोठ्या भांड्यात बारीक छिद्रे असलेल्या चाळणीने स्वच्छ करावे. याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांतच सर्व किडे पीठापासून सहजपणे वेगळे करू शकता.

फ्रिजमध्ये ठेवावे

पिठात किडे असल्यास एअर टाईट प्लास्टिक पिशवीत टाकून फ्रीजरमध्ये ठेवावे. असे केल्याने सर्व किडे थंडीमुळे मरतात. पण यासाठी तुम्हाला ५-६ दिवस पीठ फ्रिजमध्ये ठेवावे लागेल. नंतर पीठ वापरतांना गाळून घ्यावे

सुर्यप्रकाश

कडक सूर्यप्रकाशातही तुम्ही पीठ ठेऊ शकता. या उष्णतेमुळे सर्व कीटक मरतील किंवा पळून जातील. या पद्धतीमध्ये पीठ स्वच्छ करण्यासाठी अधिक प्रयत्न आणि वेळ आवश्यक आहे. यासोबतच इतर प्राणी-पक्षी पीठात तोंड घालणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल.

इतर उपाय

पीठ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा

पिठाच्या डब्यात तेजपान किंवा लवंगा ठेवावी

स्वयंपाकघरातील रॅक नेहमी स्वच्छ ठेवावी

गरजेपुरतेच पीठ खरेदी करावे

पीठ बराच वेळ वापरत नसल्यास फ्रिजमध्ये ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT