Kitchen Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: तांदळात किड लागल्यास करा 'हे' घरगुती उपाय

तांदळातील कीटकांना बाहेर काढण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Kitchen Hacks: अनेक लोक घरात महिन्याभरासाठी तर वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात. पण त्यांची काळजी घेतली नाही तर त्यात किड लागू शकते. तांदळात लवकर किड लागू शकते. तांदूळ एक ते दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवल्यास त्यावर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. यामुळे तांदळाची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

तसेच तांदळामध्ये खडे वगैरे असतील तर ते स्वच्छ करणे अवघड असतं. तांदळातील किड स्वच्छ करायला बसलो तरी दिवसभर घालवूनही आपल्याला किड स्वच्छ करता येत नाहीत.  यामुळे काही हॅक फॉलो केल्यास तुम्ही तांदळातील किड सहजपणे स्वच्छ करू शकता. 

  • वाळलेली कडूलिंबाची पानं

कीड काढण्यासाठी ही एक चांगली पद्धत आहे. यासाठी वाळलेली कडुलिंबाची पानं वापरावी लागतात. यासाठी तांदळाच्या डब्ब्यात वाळलेली कडुलिंबाची पाने टाकावी. यामुळे कीटक बाहेर पडतील. तुम्हाला प्रमाण थोडे अधिक ठेवावे लागेल, एक किंवा दोन पाने पुरेसे नाहीत. तांदळात कडुलिंबाची पानं नेहमी वाळलेलीच ठेवावी.

  • ओलाव्यापासून दूर ठेवावे तांदूळ

जर तुम्हाला तांदूळ ओलावापासून वाचवायचा असेल तर कंटेनर उघडा ठेवू नका. बॉक्सचे झाकण व्यवस्थित बसवले आहे की नाही याची विशेष काळजी घ्या. तसेच तांदूळ कोणत्याही प्रकारचे ओले पदार्थ किंवा ओल्या हाताने वापरू नये.

  • योग्य साठवणूक

तांदळाची योग्य साठवणूक केल्यास त्यात किड लागत नाही. तांदूळ साठवण्यासाठी योग्य डब्बा घ्यावा. तसेच डब्ब्याचे झाकण हवाबंद असेल याची काळजी घ्यावी.

झाकण जराही सैल वाटत असेल तर त्यात तांदूळ ठेऊ नका. तुम्ही डब्ब्याच्या झाकणावर पॉलिथिन देखाल ठेऊ शकता. तांदळ वापरण्यापुर्वी स्वच्छ धुवावा. कारण त्यावर पॉलिशिंग आणि रासायनिक प्रक्रिया केलेली असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT