Gulmohar tree Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ग्रीष्मातला राजा ‘गुलमोहर’चा बहार

सौंदर्याची मुक्त उधळण: साखळी-डिचोली मार्गावर लाल-केशरी फुलांचा सडा

दैनिक गोमन्तक

डिचोली: निसर्गाने सौदर्यांचे भरभरून वरदान दिलेले गुलमोहोराचे झाड तसे निरुपयोगी आणि कमकुवत झाड. मात्र, ज्यावेळी गुलमोहोर रसरसून फुलतो, त्यावेळी प्रत्येकाला या झाडाबद्दल कुतूहल निर्माण होते. ग्रीष्मातला राजा असलेल्या गुलमोहोराने सध्या आपल्या सौंदर्याचे खरे रूप प्रगट केले आहे.

सर्वत्र फुलांची उधळण करीत ग्रीष्मातला हा राजा प्रत्येकाशी मुक्त संवाद साधत आहे. डिचोलीत सर्वत्र गुलमोहोराची झाडे असून ही झाडे लाल-केशरी फुलांनी बहरलेली आहेत. एरव्ही दुर्लक्षित असणारे गुलमोहोराचे झाड मात्र, ज्यावेळी पूर्णपणे लाल-केशरी फुलांनी बहरुन येते, त्यावेळी या झाडाचे सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित केल्यावाचून राहत नाही.  

यावर्षी अवकाळी पावसाने कहर केल्याने गुलमोहर बहरण्यावर परिणाम होणार असा अंदाज होता. मात्र, गुलमोहराने आपल्या सौंदर्यात अजिबात कंजुषपणा दाखवलेला नाही. प्रत्येकाला गुलमोहराच्या फुलांची भुरळ पडतानाच, मनमोहक फुलांविषयी साहजिकच कुतूहलही निर्माण होत असते. काहीजण तर या फुलांच्या प्रेमातही पडतात. या नैसर्गिक किमयेचा अनुभव सध्या डिचोलीत सर्वत्र येत आहे

डिचोली-साखळी या हमरस्त्यावरील गुलमोहराची झाडे सध्या लाल-केशरी फुलांनी बहरलेली असून, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे ही झाडे लक्ष वेधून घेत आहेत.

गुलमोहर ज्यावेळी पूर्णपणे फुलांनी बहरून येतात, त्यावेळी या झाडांवर फुलांची छत्री धारण झाल्याची अनुभूती मिळत असते. मुस्लिमवाडा - डिचोली ते कारापूर - तिस्कपर्यंतच्या साधारण सहा किलोमीटर अंतरावर लहानमोठी मिळून जवळपास 40 ते 45 गुलमोहराची झाडे अजूनही दिमाखात उभी आहेत. मागील काही वर्षांत वादळी वाऱ्यात काही झाडे उन्मळून पडली आहेत. सध्या जी झाडे रस्त्याच्या बाजूने डौलदारपणे उभी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT