Kidney Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kidney Care: तुम्हालाही किडनीची समस्या असेल तर 'या' पदार्थांचे सेवन टाळा

किडनी हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Kidney Care: आपल्या शरीरातील अवयवांपैकी किडनी हा एक महत्वाचा भाग आहे. किडनीचे आरोग्य निरोगी असेल तर तुमचे आरोग्य देखील निरोगी राहते. किडनीसमभित समस्या असेल तर तुम्हाला आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. त्यामुळे किडनीशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही पदार्थ टाळले पाहिजे. यामध्ये जास्त सोडियम असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस, कार्बोनेटेड पेये आणि उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आहे. लाइफस्टाइल आणि आहारात बदल करून किडनीसंबंधित समस्या दूर ठेवता येतात.

  • लोणचं

किडनीसंबंधित समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही लोणचं खाऊ नका. लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. यामुळे लोणचं काणं टाळावे.

  • हाय प्रोटीन

निरोगी आरोग्यासाठी हाय प्रथिन पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. परंतु अशा पदार्थामचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास किडनीला हानी पोहोचवू शकते. जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनीवर दबाव येतो. बीन्स, मसूर यासारखे हाय प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे.

  • कॉफी

किडनीसंबंधित समस्या असल्यास कॉफी पिणे टाळावे. शरीरातील कॅफीनचे प्रमाण जास्त असल्यास शरीराला डिहायट्रेशन होऊ शकते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याचाही धोका वाढू शकतो जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा त्याचा किडनीवर दबाव पडतो.

  • केळी

केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळेच किडनीसंबंधित समस्या असलेल्या लोकांनी त्यापासून अंतर ठेवले पाहिजे. तुम्ही अननसाचे सेवन करू शकता. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे किडनी सुरळित कार्य करते.

  • बटाटा

बटाट्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. बटाटे वापरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. त्यामुळे पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. सर्व पोटॅशियम निघुण जाणे शक्य नाही. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी जास्त बटाटे खाऊ नयेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT