New Kia Seltos GTX+ DCT Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Kia Seltos GTX+ DCT: नवी Kia Seltos खरेदी करण्यापुर्वी जाणून घ्या खास फिचर्स

नवीन Kia Seltos GTX+ हे 1.5L टर्बो इंजिन 7-स्पीड DCT शी जोडलेले असून ज्यामुळे ती एक वेगवान एसयुव्ही बनली आहे.

Puja Bonkile

New Kia Seltos GTX+ DCT: भारतीय बाजारपेठेत Kia Seltos या नवीन मॉडेलवरून पडदा उठला आहे. अनेक नव्या पिचरसह ही कार बाजारपेठेत उपल्बध आहे.

Kia ने जुलै 2023 रोजी देशात सेलटोस फेसलिस्ट लाँच केली असून त्याची किंमत 10.90 लाख रुपये आहे. यामध्ये एसयूवी लाइन. जीटी लाइन आणि लाइनच्या तीन व्हेरियंटसह आठ शहरांमध्ये लाँच करण्यात आली आहे.

या कारच्या केबीनबद्दल सांगायचे झाले तर ही पुर्ण काळी नाही कर जीटी व्हेरिएंट्सना व्हाईट इन्सर्ट मिळतात. डीसीटी त्याच्या ड्राइव्ह मोडमध्ये देखील आहे.

ज्यामुळे इन्स्ट्रुमेंट केलस्टर पुर्णपणे रिडिझाइन केलेले दिसते. तसेच ३६० डिग्री कॅमेरा, पावर्ड हँडब्रेक आणि एडीएएस फिचर देखील टॉप-स्पेस सल्टोसमध्ये बाजारात उपल्बध आहे.

या कारला 7-स्पीड डीसीटीशी जोडलेले 1.5L टर्बो इंजिन आहे. ज्यामुळे ती एख वेगवान एसयुव्ही बनते. ही एसयुव्ही खुप वेगवान असून गिअरबॉक्स देखाल जबरदस्त आहे.

रोजच्या वापरातही तुम्ही या गाडीचा वापर करू शकता. कारण गाडी चालवायला स्मुथ आहे.

Kia Seltos मध्ये ADAS लेव्हल 2 फीचर्ससह तीन रडार आणि पाच कॅमेरे दिले आहेत. फ्रंट कोलिजन वॉर्निंग, फ्रंट कोलिजन असिस्ट-जंक्शन टर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, हाय बीम असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट कोलिजन अव्हायडन्स असिस्ट, SCC आणि स्टॉप अँड गो सह स्मार्ट क्रूझ कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा देखील समावेश आहे.

या गाडीचे इंजिन पुर्णपणे नवीन १.५ लिटर टी-जीडीआय टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे १६० पीएस आणि २५३ एनएम टॉर्क जमरेच करते. या इंजिनसह तुम्हाला 6-iMT आणि 7 DCT चा पर्याय मिळेल.

नवीन इंजिनबरोबर तुम्हाला जुने पेट्रोल आणि डिझेल इंजिन देखील या गाडीत दिले जात आहे. 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आणि 1.5 लीटर सीआरडीआय डिझेल इंजिन ज्यासह तुम्हाला अनेक ट्रान्समिशन देखील मिळतील.

याचा अर्थ तीन इंजिन आणि 5 ट्रान्समिशन ज्यामध्ये MT, iMT, IVT, 6AT, आणि 7DCT चा पर्याय उपलब्ध असेल असे नवीन फिचर या कारमध्ये दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT