NPA Loan Recovery: बँकांनी नऊ वर्षांत वसूल केली 10 लाख कोटींहून अधिक थकबाकी

Bank Loan: 2018-19 च्या अखेरीस थकबाकी 7,09,907 कोटी रुपये होती, जी मार्च 2023 मध्ये 2,66,491 कोटींवर आली आहे.
NPA Loan Recovery
NPA Loan RecoveryDainik Gomantak
Published on
Updated on

Loan Recovery: बुडीत कर्जांचे ओझे कमी करण्यासाठी सरकार आणि आरबीआयने केलेल्या उपाययोजनांमुळे बँकांनी नऊ वर्षांत 10 लाख कोटी रुपयांहून अधिक थकबाकी वसूल केली आहे.

RBI च्या आकडेवारीनुसार, अधिसूचित व्यावसायिक बँकांनी या कालावधीत एकूण ₹10,16,617 कोटी वसूल केले आहेत.

मोठ्या कर्जावरील डेटाच्या केंद्रीय भांडारानुसार, 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या कंपन्यांकडे शेड्युल्ड बँकांची थकबाकी मार्च 2023 अखेर 1,03,975 कोटी रुपये होती.

आरबीआय ने स्थापन केलेली CRILC, सावकारांच्या कर्जाशी संबंधित डेटा गोळा करते आणि त्याचे विश्लेषण करते.

NPA Loan Recovery
Star Mark On ₹ 500 Note: स्टार चिन्ह असलेल्या तुमच्याकडील नोटा खऱ्या की खोट्या? आरबीआयने केला खुलासा

20 कोटीहून अधिक बुडीत कर्जात कपात...

गेल्या पाच वर्षांत बँका आणि वित्तीय संस्थांकडील 20 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बुडित कर्जाचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

2018-19 च्या अखेरीस थकबाकी NPA 7,09,907 कोटी रुपये होती, जी मार्च 2023 मध्ये 2,66,491 कोटींवर आली आहे.

NPA Loan Recovery
ITR Filing: जेलची हवा खायची नसेल तर आयटीआर भरताना 'या' गोष्टी करू नका...

देशात कर्ज वसुलीसाठी बॅड बँकांची निर्माण

बँका बुडित कर्जाची नोंद काढून टाकतात पण ती वसूल करण्याची प्रक्रिया सुरूच असते. परंतु बँकेची अनेक कामे आहेत, कर्ज घेतलेले पैसे एनपीए झाले की बँक ते वसूल करू शकत नाही आणि बँकेचा ताळेबंदही खराब होतो.

अशा स्थितीत देशात बुडीत बँका निर्माण झाल्या आहेत. या बँका बँकांकडून कर्ज विकत घेतात आणि नंतर स्वत: वसूल करतात. त्यांचे काम केवळ वसुलीचे आहे.

यामुळे बँकांचा ताळेबंद साफ होतो. परंतु अनेक अर्थतज्ज्ञांचे असे मत आहे की कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यात सरकत आहे, संपत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com