Electric Kitchen Chimney Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Electric Kitchen Chimney: स्वयंपाकघरासाठी नवीन चिमणी खेरदी करताय? मग 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात

Electric Kitchen Chimney: चिमणी स्वयंपाकघरात लावल्यास फोडणीचा धूर आणि तेलकटपणा बाहेर जाते. यामुळे भांड्यावरचा आणि भितींवरचा चिकटपणा कमी होतो.

Puja Bonkile

Electric Kitchen Chimney: आजकाल प्रत्येक घरात चिमणी बसवलेली असते. बाजारात अनेक कंपन्यांच्या चिमण्या उपलब्ध आहेत. मात्र, चिमणी खरेदी करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. स्वयंपाकघर बंद असेल आणि खिडकी नसेल तर चिमणीशिवाय स्वयंपाक करणे अवघड होते. फोडणीचा धूर आणि तेलाचा वास सर्वत्र पसरल्याने भांडी आणि भींत चिकट होतात. स्वयंपाकघरात चिमणी बसवल्यास या समस्या कमी होतात.

टच कंट्रोल

चिमणीला टच कंट्रोल पॅनल दिले जाते. त्याच्या मदतीने पंख्याची गती वाढवू किंवा कमी करू शकता आणि टाइमर सेट करू शकता. तसेच, वाय-फाय आणि लाईटसाठी ऑन-ऑफ आणि ऑटो क्लीन टच कंट्रोलची सोय दिली जाते.

फिल्टर लेस टेक्नॉलजी

चिमणी अशी असावी की त्यात फिल्टर लेस टेक्नॉलॉजी असेल, जे हेवी ग्रिलिंग आणि तेलकटपणा कमी करण्यास योग्य असेल. यात एक सामान्य जाळी असते आणि ब्लोअर अशा प्रकारे निश्चित केले आहे की ते धूर आणि तेलाचा वास शोषून घेते.

कमी आवाज

जेव्हाही चिमणी चालवली जाते तेव्हा चिमणीचा आवाज खूप त्रासदायक असतो. स्वयंपाकघरातील ओव्हरहेड चिमणीचा आवाज स्वयंपाकघर योग्यरित्या काम करू देत नाही. अशावेळी मॅक्स सायलेन्स टेक्नॉलॉजी असलेली चिमणी खरेदी करावी. ही टेक्नॉलॉजी इतर चिमणीच्या तुलनेत 32 टक्के कमी आवाज करते.

ऑटो क्लीन टेक्नॉलजी

ऑटो क्लीन टेक्नॉलॉजी असलेली चिमणी खरेदी करावी. टच कंट्रोल पॅनलमध्ये ऑटो क्लीनचे नियंत्रण दिले जाते. तुम्ही त्याला स्पर्श करताच, चिमणी ऑटो क्लीन मोडमध्ये येते. यामुळे चिमणीच्या मोटर आणि चिमणीच्या आत असलेले तेल स्वच्छ होते.

ॲपद्वारे नियंत्रण

तुम्ही अशी चिमणी खरेदी करावी जी मोबाइल ॲपद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. याशिवाय, ॲमेझॉन अलेक्सा आणि गुगल होमद्वारे देखील ते नियंत्रित केले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT