Jaya Ekadashi 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jaya Ekadashi 2024: 'या' पद्धतीने जया एकादशीला भगवान विष्णूची करा पूजा, मिळतील शुभ फळं

तुम्हालाही जया एकादशीला भगवान विष्णचा आशिर्वाद हवा असेल तर पुजा करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

Puja Bonkile

Jaya Ekadashi 2024 do these remedies for get blessing lord Vishnu

एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित असते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी जया एकादशी जी यंदा 20 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची यथायोग्य पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

पुजेसाठी लागणारे साहित्य

काळे तीळ, तिळाचे लाडू, तुळशीचे पान , पंजिरी, पंचामृत, केळी, हंगामी फळे, सुपारी, विड्याचे पान, पिवळे वस्त्र, पिवळे फूल, धूप, दिवा, गोपी चंदन, अक्षत, एकादशी व्रत कथेचे पुस्तक, श्री हरी विष्णूची मुर्ती, गाईचे तूप, कापूर, हवन इत्यादि साहित्य घ्यावे.

जया एकादशी पूजा विधि

जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताची शपथ घ्यावी.

भगवान विष्णूला स्नान घालावे.

भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र परिधान करावे.

यानंतर फुल, फळे, धूप, दिवा, अक्षत, वस्त्र, कलव, नैवेद्य इत्यादी पूर्ण भक्तिभावाने अर्पण करावे.

जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते. नारळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूला अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी नारळाच्या रूपात श्री हरिसोबत वास करते. यानंतर भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा .

तसेच भगवान विष्णूचा 'विष्णु सहस्त्रनाम' पाठ करावे. विष्णू चालीसा आणि माता लक्ष्मी चालीसा पाठ करणे देखील शुभ मानले जाते. यानंतर भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा. भोगानंतर श्री हरी नारायणाची आरती करावी. आरतीनंतर प्रसाद म्हणून जेवण कुटुंबात वाटून घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT