Goa : A girl having fun in the rain
Goa : A girl having fun in the rain  Goa:गोमन्तक
लाइफस्टाइल

Goa: आला पाऊस

Sanjay Ghugretkar

आयुष्यातल्या चोर कप्प्यातील अशी ठेव तो दरवर्षी पहिल्या पावसात आपल्या अंगणात उतरत असतो. कितीही पावसाळे उलटले तरी नव्या नवलाईने पहिल्या पावसात नव्या नवरीसारखा चेहरा घेऊन त्या आठवणी ओंजळीत सामावित असतात...नितळणाऱ्या खिडकीचा भला मोठं कॅनव्हास झालेला असतो नि डोंगरापल्याडचा बुडणारा सूर्य त्याच्या सांजावलेल्या किरणाना त्यांचे इंद्रधनुचे रंग आजच्या पुरते आवरावयास सांगतो.

आपल्या गोव्यात (Goa) हातगाडीवरती ठेवलेली कणसं, छोटी शेगडी आणि त्या निखाऱ्यांना फुलवत कणसं भाजून देणारा मनुष्य... पावसाळ्याच्या सुमारास दृष्टीस पडणारं हमखास दृश्य... आताशा तर साधी कणसं मिळतच नाहीत, सगळीकडे स्वीटकॉर्नच मिळतात. मग ही कणसं गॅसवर किंवा घरच्या घरी बार्बेक्यूवर भाजा, त्याला एखाद्या लिंबाच्या फोडीने तिखट-मीठ लावा, आणि स्वर्गसुखाचा आनंद लुटा.. अगदीच काही चमचमीत आणि चटपटीत खायला नसलं तरी आलं किंवा गवती चहा घातलेला वाफाळता गरमागरम चहाचा कप हाती असणं यापरतं पावसाळ्यातलं सुख ते काही नाही.
वर्षभर लोक वडापाव खात असले तरी पावसाळ्यातल्या वडापावची मजा काही औरच आहे. सोबत तळलेली मिरची, वडापावचा चुरा आणि लालभडक चटणी!! अहाहा.. पावसाळ्यात घरी किमान एकदातरी कांदाभजी होतातच होतात. सूप पिण्याची मजा काही औरच. थोडीशी काळी मिरी घातलेलं गरमागरम सूप छान घसा पण शेकतं आणि पावसाळ्यात तरतरीही देतं.
उन्हानं रापलेल्या वृक्ष – वेली पहिल्या पाउसाच्या झुल्यावर हिंदोळत राहतात ..नि त्या पाहताना कसे आठवणीचे पक्षी भूतकाळाचे एक एक पदर सोडवीत जातात.अशावेळी कानावर पडणाऱ्या पाऊस गाण्याचे शब्द सूर---ताल होऊन जाणं.... कागद घेऊन एखादी कविता लिहिण्याचं धाडस करणं..नितळत्या पापण्यावरून गालावर.. ओठावर ओघळणारे थेंब चाखताना मोहोरलेल्या मनाचे स्वत:शी उगाचच हसणं...
प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याचा त्याचा खास असा पहिला पाऊस असतो.पहिल्या पावसाच्या आठवणीची भुरभूर नि त्यात रोमांचित झालेली तनु...तिचे सुखाच्या हिंदोळ्यावरील गर्भार गाणे ...त्याचा सूर...ताल ...त्यातून स्फुरणारे जगण्याचे वेडे स्वप्न ...स्वप्नाच्या चंदेरी राती.. .मखमली गालिचे...चमचमणाऱ्या आशा... फुलणाऱ्या दिशा .. असं बरचसं सानुलंस काही दाटून येतं पहिल्या पावसाच्या सरीबरोबर ...

बाहेर कोसळणारा पाऊस, (Rain) अंगावर शहारे आणणारा हवेतला गारवा, हातातल्या कपातला वाफाळता चहा हे दृश्य जोडीला चमचमीत भजी, वडापाव किंवा तत्सम काहीतरी चटकदार खाऊ असल्याशिवाय पूर्णच होत नाही. पण एकीकडे चमचमीत भज्यांवर मनापासून ताव मारत असताना दुसरीकडे मात्र आपण अतिशय तेलकट पदार्थ खात असल्याची जणिवही मनामध्ये असतेच. बाहेर मस्त पाऊस पडायला लागला की आपल्याला चमचमीत खाण्याचे वेध लागतात.पाऊस कोसळू लागला की गरमागरम कांदाभजी आणि आल्याचा वाफाळता चहा असा बेत एकदा तरी झालाच पाहिजे. चमचमीत खाण्यासाठी मन आतूर झालेले असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: शंकर पोळजींना 'राखणदार' होणे भोवले, हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी डिचोलीत तक्रार

Goa Live News Update: मतदानास उरले काही तास, पोलिसांकडून तपासणी नाक्यावर चौकशी

Bicholim News : कासरपाल संदीपक शाळेसंदर्भातील आरोप तथ्यहीन : डॉ. चंद्रकांत शेट्ये

South Goa : दक्षिणेतून भाजपचाच उमेदवार निवडून येईल! मंत्री रवी नाईक यांना विश्वास

Goa Crime Case: बहिणीच्या घरी सडतो म्हणून गोव्यात घेऊन गेले; नातेवाईकांनीच आठवडाभर केला सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT