Situationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Situationship: "सिच्युएशनशिपनंतर मैत्री शक्य आहे का?" तरुणांच्या प्रश्नाला उत्तर देताना केतकी परोब-गडेकर म्हणाल्या की....

Relationship Tips: आम्ही गोव्यातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ केतकी परोब-गडेकर यांच्याशी संवाद साधाला आणि त्यांना काही प्रश्न विचारले

Akshata Chhatre

From Situationship to Friendship

सध्याच्या तरुण पिढीला सर्वात भेडसावणारा प्रश्न म्हणजे रिलेशनशिप. माझा पार्टनर कसा असावा, त्याच्यात कोणते गुण असले पाहिजेत किंवा मला या नात्यातून काय पाहिजे अशा एकांनएक चिंतांनी डोकं हैराण होतं. सध्या तरुणाईमध्ये हा वाढता प्रश्न आहे, अनेकवेळा असं होतं की काय तरी चुकतंय हे समजत असलं तरीही नेमकं काय चुकतंय हे समजत नाही आणि मनात नसून सुद्धा पाऊलं वेगळ्या दिशेने पडायला सुरूवात होते.

काही लोकांच्या मते पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावर कळत-नकळत परिणाम होतोय आणि तरुण पिढीचा कल बदलत चालला आहे. नाती, प्रेम, रिलेशनशिप याबाबत आम्ही गोव्यातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ केतकी परोब-गडेकर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना काही प्रश्न विचारले, चला मग जाणून गोव्यातील तरुणाईला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर नेमकी आहेत तरी काय...

आम्ही केतकी यांच्याशीसिच्युएशनशिपवर चर्चा केली आणि त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. आपल्याला कदाचित वाटलं देखील नसेल पण हे सिच्युएशनशिपचं वारं आपल्या गोव्यापर्यंत येऊन पोहोचलंय. कदाचित तुम्हाला माहितीही नसेल पण तुम्ही एका सिच्युएशनशिपचा भाग बनला आहात.

त्यांनी सगळ्यात आधी सिच्युएशनशिप म्हणजे काय हे उलघडून सांगितलं, त्या म्हणतात की एखाद्या सिच्युएशनमध्ये दोन लोकं भेटतात, एकत्र येतात आणि रिलेशनशिपची सुरुवात होते, मात्र यामध्ये सामील एका पार्टनरला सुद्धा जर का असं वाटलं की हे नातं आणखीन पुढे नाही जाऊ शकत आपण इथेच थांबलं पाहिजे तर दुसरा माणसू देखील काहीही आढेवेढे न घेता ते नातं संपवतो. यापूर्वी लिव्हइन रिलेशनशिप अशी एक संकल्पना रूढ झाली होती पण सिच्युएशनशिप हे त्याहीपेक्षा कमी काळ चालणारं नातं आहे.

सध्या गोव्यात सिच्युएशनशिपचं प्रमाण वाढतंय. अनेकवेळा भावनिक गरजेपेक्षा तरुणांमध्ये शारीरिक गरज भागवण्यासाठी सिच्युएशनशिप सारख्या नात्यांचा आधार घेतला जातो, मात्र यात असणारा प्रमुख अडथळा म्हणजे भावनिक गुंतवणूक. आपल्या भावना ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे, भावनिकदृष्ट्या आपण कोणाहीसोबत गुंतू शकतो.

सिट्युएशनशिप सारख्या नात्याला बंधनं नसतात, समोरचा पार्टनर मनात आल्यास अर्ध्यावर काहीही न सांगता नातं संपवून जाऊ शकतो आणि भावनिक गुंतागुंतीमध्ये दुसरा मात्र अडकतो तो कायमचाच. गोव्यातील तरुणांनासुद्धा हे बऱ्यापैकी माहितीये की अशा नात्यांचा नेमका अर्थ काय होतो, समुपदेशन करताना वयाचे बंध जुगारून अशा नात्यांमध्ये एकतर्फी अडकलेल्या अनेकांना भेटल्याचं केतकी त्यांनी आम्हाला सांगितलं.

सिच्युएशनशिप सारखं नातं काय असतं याचा अंदाज आता तुम्हाला आलाच असेल. पण जर का आपण अशा एखाद्या नात्याचा भाग असू, काही कारणास्तव हे नातं संपलेलं असेल तर आपल्या त्या पार्टनरला एक मित्र म्हणून भेटणं किती बरोबर आहे असं आम्ही केतकी यांना विचारलं आणि यावर त्यांनी देखील बुद्धीला पटणारी उत्तरं दिली. सिच्युएशनशिप सारख्या नात्यात पुन्हा त्याच माणसासोबत मित्र बनून राहावं की नाही हा पाहिलं म्हणजे वैयक्तिक निर्णय असतो.

काही लोकं प्रचंड गुंतलेली असतात आणि म्हणून पुन्हा त्याच माणसाला भेटणं त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं, पण आजकाल आपण तांत्रिक युगात वावरतोय आणि आपल्यावर नाही म्हटलं तरीही पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असल्याने अनेकांना यात काहीही गैर वाटत नाही. त्यांच्यामते आपल्यात तेव्हा जे काही झालं तो एक सिच्युएशनशिपचा भाग होता, आपण दोघेही त्यामधून बाहेर आलो आहोत आणि म्हणून आता मैत्री करण्यात आम्हाला काहीही गैर वाटत नाही.

या उत्तरावरून एक लक्षात येतं की यात चूक किंवा बरोबर अशी बाजू नाही तर तुम्ही कसे आहात हे जाणून घेऊन निर्णय घेणं महत्वाचं आहे. मग जर का तुम्हाला हा प्रश्न सतावत असेल तर यामधून मार्ग कोणता?

सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोण आहात हे ओळखा. तुम्ही जेव्हा स्वतःला नीट ओळखाल तेव्हाच आपला पार्टनर कसा असावा याच उत्तर मिळणार आहे. आपण दिवसभर अत्यंत बिझी असतो, पण किमान आठवड्यातून काहीवेळ स्वतःसाठी नक्कीच काढू शकतो. यावेळेत स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. काहीवेळ ध्यानधारणा करा, मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा आणि हळहळू तुम्हालाच उलघडेल की तुम्ही स्वतः कोण आहात. मनाचा चंचलपणा कमी झाला की आपोआप प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होते.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, तुम्ही मुलगा आहात, की मुलगी याच्याशी आर्थिक घटकाचा काहीही संबंध नाही. स्वतःसाठी कमवा, तेव्हा तुम्हाला गरजा समाजतील, जबाबदारीची जाणीव होईल. ट्रायल अँड एररमध्ये अडकलात तर कायम काहीतरी शोधात राहाल, कुठेच थांबू शकणार नाही आणि म्हणूनच स्वतःला ओळखून त्यानंतर मला काय पाहिजे या दृष्टीने विचार सुरु करा.

सध्या तरुणाईमध्ये हीच समस्य वाढलीये, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे माहिती नसतं, आर्थिक बाजू सक्षम नसते आणि नातं मात्र एकदम नीट असावं असं वाटतं, मात्र हे शक्य नाही. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही कसे आहात हे सगळ्यात आधी जाणून घ्या, त्यानंतर तुम्ही व्यावसायिक आयुष्य कसं जगताय हे तपास, यानंतर समाजात तुमचा वावर कसा आहे याची माहिती घ्या आणि सर्वात शेवटी आध्यात्मिक बाजू तपासा आणि कायम लक्षात ठेवा ही चारही चाकं नीट असतील तर आयुष्यात कुठलंही नातं अगदी सहज पेलू शकाल, त्यामुळे स्वतःला ओळखा.

केतकी परोब-गडेकर

(मानसशास्त्रज्ञ-गोवा)

(ketakiparobgadekar@gmail.com)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT