Tiger Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tiger Day 2022: वाघ असोत...जंगले असोत

International Tiger Day 2022: भव्यता, उग्रता, सौंदर्य आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या वाघाला नम्र भावाने जाणून घेणे म्हणजे आपण पर्यावरणाला जाणून घेण्यासारखे होईल.

दैनिक गोमन्तक

आज ‘जागतिक वाघ दिवस’! दरवर्षी 29 जुलै या दिवशी हा दिवस  साजरा केला जातो. आपल्या देशाने गेल्या दहा वर्षात सुमारे 1000 वाघ गमावले आहे. वाघाचे असे नाहीसे होणे हे केवळ  वाघापुरते मर्यादित नसते तर वाघाबरोबर आपण नैसर्गिक पर्यावरणालाही पारखे होतो. आपण एक जंगल गमावतो. या वर्षाच्या सुरुवातीच्या 7 महिन्यात आपल्या देशात 75 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या भारतात सुमारे 3000 वाघ आहेत असे गृहीत धरले जाते.

2006 मध्ये आपल्या देशात असणाऱ्या वाघांची संख्या होती 1411 , जी सर्वकालीन कमी होती. त्यानंतर संबंधितांना धडाधड जाग आली. वाघाच्या संवर्धन धोरणात, कायद्यांत आणि व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले. वाघांचा मध्यवर्ती अधिवास मानल्या गेलेल्या जागेमधून गावांचे स्थलांतर करण्यात आले. विशेष दल स्थापन करून वाघांना संरक्षित करण्यात आले. याचा परिणाम म्हणून 2010 साली वाघांची संख्या 1701 या आकड्यावर पोहोचली.

वाघांच्या संवर्धनाच्या बाबतीत असलेले धोके आजही कमी झालेले नसले तरी आपल्या देशाने वाघांच्या संख्येत वाढ होण्याबाबत समाधानकारक पायरी गाठली आहे. आज आपला देश जगात अस्तित्वात असलेल्या वाघांपैकी 70 टक्के वाघांचे निवासस्थान आहे. ही आपली प्रगती इथेच थांबता कामा नये. वाघ हे गुढतेचे आणि शक्‍तीचे फार सुंदर असे प्रतिक आहे. मर्जार कुळातील हा सर्वात मोठा प्राणी, त्याच्या चालण्यातल्या, नजरेतल्या रुबाबाने पाहणाऱ्याला भारून टाकतो. हजारो एकर क्षेत्रावर तो आपली अधिसत्ता नैसर्गिक स्वामित्वभावाने सहज स्थापित करतो.

‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड’ ही संस्थादेखील गेले पाच दशके राज्य वनखाते, स्थानिक जमात, माध्यमे आदींच्या सहकार्याने भारतात (India) वाघांच्या संरक्षणासंबंधाने काम करते आहे. वाघ हजारो मैलाच्या टापूत अधिवास करत असतो त्यामुळे त्याचा माग घेणे कठीण असते. ‘डबल्यू डब्ल्यू एफ’ वाघांच्या हालचालींचा आणि वर्तनाचा अभ्यास कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे करते.

आधुनिक तंत्रज्ञान आणि साधने पुरवून संबंधित सरकारी खाते सुसज्ज बनवण्यावर ती भर देते. वाघांचा अधिवास असलेल्या भागाच्या आसपास राहणाऱ्या लोकांना त्यांनी विश्‍वासात घेतले आहे व त्यांना त्यांच्या सक्रिय सहभागासाठी तयार केले आहे. हे फार महत्त्वाचे आहे. सरकार आणि इतर संस्था वाघांबाबत जागरुकता जरी दाखवत असले तरी वाघांची गटवारी अजून ‘संकटग्रस्त’ अशीच केली जाते.

गोव्यात (Goa) या वर्षात वाघाने कॅमेऱ्यावर (Camera) आपले दर्शन दिले. त्यामुळे जो गदारोळ उठला तो आपण साऱ्यांनीच अनुभवला आहे. ‘वाघ’ (Tiger) हे प्रकरण जरी सुंदर असले तरी अस्तित्वाच्या बाबतीत ते किती ‘नाजूक’ आहे याची प्रचितीही त्यानिमित्ताने आली. आजच्या दिनी भव्यता, उग्रता, सौंदर्य आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या वाघाला नम्र भावाने जाणून घेणे हे एका अर्थी आपण पर्यावरणाला जाणून घेण्यासारखे होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT